काँग्रेसच्या आमदारांचे सोनिया गांधींना पत्र

राज्यातील महाविकास आघाडी सरकारमधील काँग्रेस आमदारांमध्ये नाराजी निर्माण झाली आहे. काँग्रेसच्या २५ नाराज आमदारांनी काँग्रेस कमिटीच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांच्याकडे पत्र लिहित कैफियत मांडली आहे. काँग्रेस आमदार संग्राम थोपटे यांच्या नेतृत्वाखाली २५ नाराज आमदार एकवटले असून पुढील महिन्यात ते सोनिया गांधी यांची भेट घेणार आहेत. महाविकास आघाडीमधील काँग्रेसचे आमदार स्वपक्षाच्या मंत्र्यांवर नाराज आहेत. त्यामुळे या […]

काँग्रेसच्या आमदारांचे सोनिया गांधींना पत्र

राज्यातील महाविकास आघाडी सरकारमधील काँग्रेस आमदारांमध्ये नाराजी निर्माण झाली आहे. काँग्रेसच्या २५ नाराज आमदारांनी काँग्रेस कमिटीच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांच्याकडे पत्र लिहित कैफियत मांडली आहे. काँग्रेस आमदार संग्राम थोपटे यांच्या नेतृत्वाखाली २५ नाराज आमदार एकवटले असून पुढील महिन्यात ते सोनिया गांधी यांची भेट घेणार आहेत.

महाविकास आघाडीमधील काँग्रेसचे आमदार स्वपक्षाच्या मंत्र्यांवर नाराज आहेत. त्यामुळे या नाराज आमदारांनी सोनिया गांधी यांना पत्र लिहून नाराजी व्यक्त केली आहे. तसेच या पत्रावर २० आमदारांच्या स्वाक्षऱ्या आहेत. मविआमधील काँग्रेसचे काही मंत्री नाराज मंत्र्यांकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप पत्राद्वारे करण्यात आला आहे. काँग्रेस आमदार संग्राम थोपटे यांच्या नेतृत्वाखाली हे नाराज आमदार एकवटले असून पुढील महिन्यात हे आमदार सोनिया गांधी यांची भेट घेणार आहे.

काँग्रेसच्या २५ नाराज आमदारांनी सोनिया गांधींना पत्र लिहून भेटीची वेळ मागितली आहे. यामध्ये काँग्रेस आमदार संग्राम थोपटे, प्रणिती शिंदे आणि कुणाल पाटील यांनी पुढाकार घेतला आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number