विधान परिषदेची निवडणूक रंगणार

विधान परिषदेची निवडणूक चांगलीच रंगणार आहे. २० जूनला विधानपरिषदेची निवडणूक होणार आहे. विधान परिषदेच्या दहा जागांसाठी महाविकास आघाडी कडून सहा उमेदवार तर भारतीय जनता पक्षाकडून पाच उमेदवार रिंगणात उतरले आहेत. भारतीय जनता पक्षाकडून प्रवीण दरेकर, प्रसाद लाड, राम शिंदे, उमा खापरे आणि श्रीकांत भारतीय हे असणारे उमेदवार रिंगणात उतरवले आहेत. अपक्ष उमेदवार सदाभाऊ खोत यांनी […]

विधान परिषदेची निवडणूक रंगणार

विधान परिषदेची निवडणूक चांगलीच रंगणार आहे. २० जूनला विधानपरिषदेची निवडणूक होणार आहे. विधान परिषदेच्या दहा जागांसाठी महाविकास आघाडी कडून सहा उमेदवार तर भारतीय जनता पक्षाकडून पाच उमेदवार रिंगणात उतरले आहेत. भारतीय जनता पक्षाकडून प्रवीण दरेकर, प्रसाद लाड, राम शिंदे, उमा खापरे आणि श्रीकांत भारतीय हे असणारे उमेदवार रिंगणात उतरवले आहेत. अपक्ष उमेदवार सदाभाऊ खोत यांनी उमेदवारी अर्ज घेतला मागे आहे.

महाविकास आघाडी कडून काँग्रेसचे उमेदवार भाई जगताप आणि चंद्रकांत हांडोरे, राष्ट्रवादीकडून रामराजे निंबाळकर आणि एकनाथ खडसे तर, शिवसेनेकडून आमशा पाडवी आणि सचिन अहिर रिंगणात उतरवले आहेत. राज्यसभेची निवडणूक पार पडल्यानंतर आता आगामी २० जून रोज विधान परिषदेची निवडणूक होणार आहे. राज्यसभेच्या निकालानंतर नऊ दिवसांवर येऊन ठेपलेल्या विधानपरिषदेसाठी भाजपाचा आत्मविश्वास दुणावला आहे. विधानपरिषदेची निवडणूकही गुप्त मतदानाने होणार असल्याने महाविकास आघाडीत चिंतेचं वातावरण आहे. त्यामुळे विधान परिषदेची निवडणुकही अत्यंत अटीतटीची होण्याची चिन्ह आहेत.

विधान परिषदेच्या निवडणूकीसाठी १० जागांसाठी ११ जण रिंगणात असल्याने राज्यसभेप्रमाणेच रस्सीखेच बघायला मिळणार आहे. शिवसेनेने सुभाष देसाई आणि दिवाकर रावते या दोघांनाही संधी नाकारत सचिन अहिर व नंदुरबारचे जुने शिवसैनिक आमशा पाडवी यांना संधी दिली आहे. राष्ट्रवादीकडून माजी सभापती रामराजे नाईक निंबाळकर आणि एकनाथ खडसेंना उमेदवारी देण्यात आली आहे. तर काँग्रेसने माजी मंत्री चंद्रकांत हंडोरे आणि मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष भाई जगताप या दोन मुंबईकर नेत्यांना मैदानात उतरविले आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number