किरेन रिजिजूंवर वकिलांची नाराजी

कायदा मंत्री किरेन रिजिजू यांच्या वकिलांबाबतच्या वादग्रस्त वक्तव्याचा सर्वोच्च न्यायालय आणि उच्च न्यायालयाच्या वकिलांनी निषेध व्यक्त केला आहे. किरेन रिजिजूंच्या वक्तव्यामुळे वकिलांनी संताप व्यक्त करत संयुक्त निवदेन सादर केले आणि मंत्री रिजिजू यांचा समाचार घेतला आहे. किरेन रिजिजू म्हणाले होते की, ‘काही निवृत्त न्यायाधीश भारत देशाविरोधी असलेल्या गटाचा भाग बनलेले आहेत. हे वकील कार्यपालिका आणि […]

किरेन रिजिजूंवर वकिलांची नाराजी

कायदा मंत्री किरेन रिजिजू यांच्या वकिलांबाबतच्या वादग्रस्त वक्तव्याचा सर्वोच्च न्यायालय आणि उच्च न्यायालयाच्या वकिलांनी निषेध व्यक्त केला आहे. किरेन रिजिजूंच्या वक्तव्यामुळे वकिलांनी संताप व्यक्त करत संयुक्त निवदेन सादर केले आणि मंत्री रिजिजू यांचा समाचार घेतला आहे.

किरेन रिजिजू म्हणाले होते की, ‘काही निवृत्त न्यायाधीश भारत देशाविरोधी असलेल्या गटाचा भाग बनलेले आहेत. हे वकील कार्यपालिका आणि न्यायपालिकेत वाद निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यामुळे त्यांना त्याची शिक्षा मिळेल. देशाविरोधात काम करणाऱ्या व्यक्तीला किंमत चुकवावी लागेल. असे ते म्हणाले.’

रिजिजू यांच्या या वक्तव्यामुळे वकिलांमध्ये संताप दिसून येत आहे. सर्वोच्च न्यायालय आणि देशातल्या वेगवेगळ्या उच्च न्यायालयांमधील ३०० हून अधिक वरिष्ठ वकिलांनी कायदामंत्री किरेन रिजिजू यांना पत्र लिहून नाराजी व्यक्त केली आहे.

वकिलांच्या पत्रात असे लिहिले आहे की, एका सरकारच्या मंत्र्याला अशाप्रकारे दबाव आणणे शोभत नाही. सरकारवर टीका करणे ही देशविरोधी कृती नाही. तसेच ही देशद्रोहीपणाचे कृत्यही नाही. निवृत्त न्यायाधीशांना धमकी देऊन कायदा मंत्री विरोधाचा कोणताही आवाज खपवून घेतला जाणार नाही, असं नमूद करण्यात आलं आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number