मनसेच्या महाअधिवेशनात आज राज ठाकरे यांचे पुत्र अमित ठाकरे यांनी राजकारणात प्रवेश केला आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या नेतेपदी त्याची निवड करण्यात आली.
27 वर्षांत पहिल्यांदाच व्यासपीठावर बोलतोय, त्यामुळे माझ्यासाठी हा मोठा दिवस आहे.
महाविकास आघाडी सरकारवर मनसेची नजर असेल. मंत्रीमंडळावर शॅडो कॅबिनेटची नेमणूक करणार
राज ठाकरे यांना धन्यवाद. मनसेचा ठराव मांडणार हे काल मला संध्याकाळी सांगितलं.
पायाखालची जमीन सटकणं काय असतं याचा अनुभव आला.
शॅडो कॅबिनेट म्हणजे काय?
कॅबिनेट हे संसदेला, विधिमंडळाला प्रामुख्याने कनिष्ठ सभागृहाला जबाबदार असले, तरी अंतिमत: ते जनतेला जबाबदार असतात.
कॅबिनेट पद्धतीत विरोधी पक्षाला अतिशय महत्त्व असते; कारण पर्यायी पक्ष म्हणून तोच अधिकारावर येण्याची शक्यता असते.
विरोधी पक्षाच्या कॅबिनेटला ‘शॅडो कॅबिनेट’ म्हणतात. मंत्र्यांच्या कारभारावर लक्ष ठेवण्याची जबाबदारी या नेत्यांची असते.