राष्ट्रीय ललित कला सन्मान

'लोकनेते राजारामबापू पाटील राष्ट्रीय ललित कला सन्मान' पुरस्काराकरिता डॉ. अरुणा ढेरे, डॉ. दिलीप धोंडगे, अतुल पेठे, डॉ. सचिन केतकर, डॉ. देविदास वायदंडे, डॉ. संजय करंदीकर यांची निवड करण्यात आली आहे.

राष्ट्रीय ललित कला सन्मान

बडोदा : राजारामबापू पाटील ललित कला अकादमी, महाराष्ट्र राज्य या संस्थेच्यावतीने राजारामबापूंच्या स्मरणार्थ  देण्यात येणाऱ्या २०२४ च्या 'लोकनेते राजारामबापू पाटील राष्ट्रीय ललित कला सन्मान' पुरस्काराकरिता डॉ. अरुणा ढेरे, डॉ. दिलीप धोंडगे, अतुल पेठे, डॉ. सचिन केतकर, डॉ. देविदास वायदंडे, डॉ. संजय करंदीकर यांची निवड करण्यात आल्याची माहिती अकादमीचे निमंत्रक व राज्य साहित्य संस्कृती मंडळाचे सदस्य कवी प्रा. प्रदीप पाटील यांनी दिली आहे. पुरस्कार वितरण समारंभ राजारामबापू अकादमी आणि मराठी वाड्.मय परिषद बडोदे यांच्या संयुक्त विद्यमाने रविवारी, ३० जून रोजी बडोदा येथे होणार आहे. डॉ. अरुणा ढेरे यांना जीवन गौरव रु.५०,०००, सन्मानचिन्ह व मानपत्र तर डॉ. दिलीप धोंडगे, अतुल पेठे, डॉ. सचिन केतकर यांना प्रत्येकी २५,०००, सन्मानचिन्ह व मानपत्र तर विशेष सन्मान डॉ. देविदास वायदंडे, डॉ. संजय करंदीकर यांना प्रत्येकी रु.१०,००० व सन्मान चिन्ह असे पुरस्कार दिले जातील. हे पुरस्काराचे दुसरे वर्ष आहे. राशपचे प्रदेशाध्यक्ष आणि आमदार जयंत पाटील हे राजारामबापू अकादमीचे मार्गदर्शक आहेत.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number