भावा – बहिणीवर कोयत्यानं हल्ला

बहिणीची छेड का काढली विचारायला गेलेल्या भावास संशयिताने भाव बहिणीला जीवे मारण्याची धमकी देत धार धार कोयत्याने डोक्यावर, पायावर, आणि पार्श्व्भागावर वार केले. तसेच पीडित बहीण भावाला सोडवण्यासाठी गेल्यावर तिच्यावर पण हातावर आणि डोक्यावर कोयत्याने वार केले. हि धक्कादायक घटना नाशिक अंबड लिंकरोडी येथे घडली आहे. अंबड पोलिस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तरुणी […]

भावा – बहिणीवर कोयत्यानं हल्ला

बहिणीची छेड का काढली विचारायला गेलेल्या भावास संशयिताने भाव बहिणीला जीवे मारण्याची धमकी देत धार धार कोयत्याने डोक्यावर, पायावर, आणि पार्श्व्भागावर वार केले. तसेच पीडित बहीण भावाला सोडवण्यासाठी गेल्यावर तिच्यावर पण हातावर आणि डोक्यावर कोयत्याने वार केले. हि धक्कादायक घटना नाशिक अंबड लिंकरोडी येथे घडली आहे. अंबड पोलिस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

तरुणी रविवारी सायंकाळी ६.१५ वाजताच्या सुमारास बुरकुले हॉल, सिडको येथून पायी जात असताना संशयित विशाल देवरे याने पीडितेची छेड काढून तिला शिवीगाळ केल्याची घटना घडली. त्यामुळे पीडित मुलीने घडलेला प्रकार घरी येऊन भावाला सांगितला. त्यामुळे पीडितेचा भाव संशयित विशाल देवरे यास जाब विचारण्यासाठी खंडोबा मंदिराजवळ, मोरवाडी येथे गेला. त्यावेळी विशाल देवरे याने शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. आणि त्याचे मित्र निलेश अहिरे, गौरव पेणमहले, अनिकेत हुले, सुधीर अहिरे, सोनू यांनी मुलीच्या भावाला पकडून ठेवले आणि विशाल देवरे याने त्याच्या जवळील कोयता काढून त्याच्या पायावर, हातावर, डोक्यात आणि पार्शवभागावर वार केले.

त्यावेळेवेळा सोडवण्यासाठी गेलेल्या बहिणीवर देखील विशाल देवेरेने वर करून जीवे मारण्याचा प्रयत्न केला. या सर्वांविरोधात पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे,

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number