कोल्हापुरात दूध दराचे आंदोलन चिघळण्याची शक्यता

कोल्हापूर : पुन्हा एकदा दूध दराचे आंदोलन चिघळण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांना दुग्धव्यवसाय सध्या परवडणारा नाही. उत्पादनखर्चा एवढाही दर दूध संघाकडून मिळत नाही. त्यामुळे शेतकर्‍यांमधून दूध दरवाढीची मागणी पुढे येऊ लागली आहे. कोल्हापुरातील बहुतांश दुग्धव्यवसायिकांकडील दूध गोकुळ संघाला जाते. त्यामुळे गोकुळ दूध संघाने दूध दरवाढ करावी. अशा प्रकारची मागणी शेतकरी करत आहेत. आमदार सतेज पाटील यांनी […]

कोल्हापुरात दूध दराचे आंदोलन चिघळण्याची शक्यता

कोल्हापूर : पुन्हा एकदा दूध दराचे आंदोलन चिघळण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांना दुग्धव्यवसाय सध्या परवडणारा नाही. उत्पादनखर्चा एवढाही दर दूध संघाकडून मिळत नाही. त्यामुळे शेतकर्‍यांमधून दूध दरवाढीची मागणी पुढे येऊ लागली आहे.

कोल्हापुरातील बहुतांश दुग्धव्यवसायिकांकडील दूध गोकुळ संघाला जाते. त्यामुळे गोकुळ दूध संघाने दूध दरवाढ करावी. अशा प्रकारची मागणी शेतकरी करत आहेत. आमदार सतेज पाटील यांनी सुद्धा शेतकऱ्यांची ही भूमिका लावून धरली आहे.

गोकुळने चार रुपयांची दरवाढ करावी अशी त्यांनी मागणी केली आहे. मागणी मान्य न केल्यास मोर्चा काढण्याचा इशाराही त्यांनी दिला आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number