नाशिकमध्ये एकाच दिवशी चार मुली गायब झाल्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. याप्रकरणी मुलींच्या पालकांनी पोलिसांत तक्रार केली असून दिवसेंदिवस मुली बेपत्ता होण्याचे प्रमाण वाढत आहे. त्यामुळे नाशकात मुली अपहरण प्रकरणी भाजप नेते चित्रा वाघ यांनी ट्विट करत प्रश्न उपस्थित केला आहे. शुक्रवारी एकाच दिवशी नाशिकमधून ४ मुली बेपत्ता झाल्या होत्या, त्यामुळे राज्यात अपहरण करणारी टोळी फिरत असून पोलीस आणि राज्य सरकारला याप्रकरणाचे गांभीर्य नसल्याची टीका भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी केली आहे.
चित्रा वाघ यांनी ट्विट केले की, ‘धक्कादायक…नाशिकमध्ये एकाच दिवशी ४ मुलींचे अपहरण. आधीचा २५०००चा आकडा आहेच… मात्र राज्यात अपहरण करणारी टोळी फिरत असून कोवळ्या मुलींना सावज बनवलं जात आहे. तरीही पोलीस महाविकास आघाडी सरकारला त्याचे गांभीर्य उरलेले दिसत नाही. या मुलींचया जीवाचे काही बरेवाईट झाले तर जबाबदारी या नाकर्त्या सरकारचीच असेल.’ असे ट्विट चित्रा वाघ यांनी केली आहे.
धक्कादायक…नाशिकमध्ये एकाच दिवशी ४ मुलींचं अपहरण
आधीचा २५०००चा आकडा आहेचं राज्यात अपहरण करणारी टोळी फिरतीये
कोवळ्या मुलींना सावज बनवलं जातयं.. तरीही पोलिस #MVA सरकारला त्याचं गांभिर्य उरलेलं दिसत नाहीये या मुलींच्या जीवाचं काही बरंवाईट झालं तर जबाबदारी या नाकर्त्या सरकारचीच — Chitra Kishor Wagh (@ChitraKWagh) January 9, 2022
नाशिकमधील पंचवटीयेथील हिरावाडी परिसरातील मुलगी, दिंडोरी रोडवरील शिवाजीनगर परिसरातील मुलगी, भाभानगरमधील गायकवाड हॉलजवळ राहणारी मुलगी, तसेच नाशिकरोडमधील पळसे येथील एसटी कॉलनीतील मुलगी असा चार मुंलींचे एकाच दिवशी अपहरण करण्यात आले. नाशिकमध्ये एकाच दिवशी ४ मुली बेपत्ता झाल्यामुळे एकच खळबळ उडाली.