बॉलिवूड अभिनेता कार्तिक हा नेहमीच सोशल मीडियावर चर्चेत असतो. कार्तिक हा नेहमीच सोशल मीडियावर फोटो शेअर करत असतो. मुलींमध्ये कार्तिक आर्यन क्रेझ हा प्रचंड आहे.
कार्तिकने नुकताच एक फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केला आणि या फोटोवर एका आलेल्या कॉमेंटनं सर्व नेटकऱ्यांच लक्ष वेधलं आहे.
सोशल मीडियावर या फोटोवर आलेल्या कॉमेंटनंतर अनेक नेटकऱ्यांनी या फोटोवर कमेंट आल्या आहे. कार्तिकच्या एका फॅनने इन्स्टाग्रामवर पोस्ट केलेल्या फोटोवर एक अनोखी कॉमेंट केली होती. “माझ्या कॉमेंटवर रिप्लाय दे. या रिप्लायसाठी मी तूला एक लाख रुपये देतो.”अशी कॉमेंट केली त्यानंतर यावर खुद्द कार्तिकने कॉमेंट केली आणि त्यांनं लिहलं “हा घे रिप्लाय कुठे आहेत एक लाख रुपये” त्याची ही कॉमेंट सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे.

या कॉमेंटनंतर अनेक कॉमेंट या फोटोवर आल्या. ज्यात कार्तिकला अनेक चाहत्यानी वेगवेगळ्या ऑफर दिल्या आहे. कोणी कार्तिकला 5 लाख तर 20 लाख कॉमेंट करून कार्तिकचे लक्ष वेधून घेण्याचा प्रयत्न केला आहे. या फोटोवर अनेक नेटकऱ्यांच्या कॉमेंटवर आल्या आहे.