वयाच्या 42 व्या वर्षी ‘ही’ अभिनेत्री होणार आई, सोशल मिडियावर पोस्ट शेअर केली गुड न्यूज

ही बातमी कळताच चाहते आणि सेलिब्रिटींकडून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

वयाच्या 42 व्या वर्षी ‘ही’ अभिनेत्री होणार आई, सोशल मिडियावर पोस्ट शेअर केली गुड न्यूज

लोकप्रिय टीव्ही अभिनेत्री करिश्मा तन्ना लग्नाच्या चार वर्षांनंतर आई होणार आहे. अभिनेत्रीने नुकतीच सोशल मीडियावर एका खास पोस्टद्वारे ही आनंदाची बातमी तिच्या चाहत्यांसोबत शेअर केली आहे. ही बातमी कळताच चाहते आणि सेलिब्रिटींकडून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

करिश्माने तिचा पती वरुण बंगेरासोबतचे सुंदर फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये ते आई आणि वडिलांच्या भूमिकेत दिसत आहेत. त्यांना एकत्र पाहून चाहते आणि सेलिब्रिटी त्यांचे अभिनंदन करत आहेत.

करिश्मा तन्ना शेवटची हंसल मेहता यांच्या ‘स्कूप’ या मालिकेत दिसली होती. जिग्ना वोरा यांच्या ‘बिहाईंड बार्स इन बायकुला’ या पुस्तकावर आधारित, ‘स्कूप’ ही मालिका धाडसी क्राईम रिपोर्टर जागृती वोरा (करिश्मा तन्नाने साकारलेली भूमिका) हिची कथा आहे. 

या मालिकेने दक्षिण कोरियातील बुसान येथे आयोजित एशिया कंटेंट अवॉर्ड्स आणि ग्लोबल ओटीटी अवॉर्ड्स २०२३ मध्ये अनेक पुरस्कार जिंकले. या मालिकेने सर्वोत्कृष्ट आशियाई टीव्ही मालिका आणि सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार पटकावला.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number