Pakistan Afghanistan Airstrike: इराण-इस्रायल संघर्षानंतर आता पाकिस्तान-अफगाणिस्तान आमनेसामने; थेट रुग्णालयावर बॉम्बहल्ला, 400 जणांचा मृत्यू

तालिबान प्रशासनाच्या मते या हल्ल्यात सुमारे 400 जणांचा मृत्यू झाला असून 250 जण जखमी झाले आहेत. मात्र पाकिस्तानने हे सर्व आरोप फेटाळून लावले आहेत.

Pakistan Afghanistan Airstrike: इराण-इस्रायल संघर्षानंतर आता पाकिस्तान-अफगाणिस्तान आमनेसामने; थेट रुग्णालयावर बॉम्बहल्ला, 400 जणांचा मृत्यू

काबुल: मध्यपूर्वेत सुरू असलेल्या इराण-इस्रायल-अमेरिका संघर्षाच्या पार्श्वभूमीवर जगभरातील परिस्थिती अधिक तणावपूर्ण बनत आहे. या संघर्षाचे पडसाद आता इतर देशांवरही उमटताना दिसत असून पाकिस्तान आणि अफगाणिस्तान यांच्यातील तणावही दिवसेंदिवस वाढत आहे. गेल्या काही दिवसांपासून दोन्ही देशांमध्ये आरोप-प्रत्यारोप आणि हल्ल्यांची मालिका सुरू असल्याचे वृत्त समोर येत आहे.

अफगाणिस्तानने आरोप केला आहे की पाकिस्तानने सोमवारी उशिरा रात्री काबुलमध्ये एका रुग्णालयावर हवाई हल्ला केला. तालिबान प्रशासनाच्या म्हणण्यानुसार या हल्ल्यात आतापर्यंत सुमारे 400 जणांचा मृत्यू झाला असून 250 जण जखमी झाले आहेत. इस्लामिक अमिरात अफगाणिस्तानचे उपप्रवक्ते हमदुल्ला फितरत यांनी सांगितले की पाकिस्तानच्या लष्कराने काबुलमधील एका व्यसनमुक्ती केंद्रावर बॉम्बहल्ला केला, ज्यामुळे मोठ्या प्रमाणावर जीवितहानी झाली.

हेही वाचा: आखाती देशात युद्ध सुरू असतानाच अमेरिकेतील रस्ते बंद, विमानांची उड्डाणंही रद्द…माजला हाहाकार

फितरत यांच्या मते, या हल्ल्यामुळे इमारतीचा मोठा भाग उद्ध्वस्त झाला आहे. सध्या बचाव पथके घटनास्थळी कार्यरत असून इमारतीत लागलेल्या आगीवर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न करत आहेत. तसेच ढिगाऱ्याखाली अडकलेल्या मृतदेहांना बाहेर काढण्याचे कामही सुरू असल्याचे त्यांनी सांगितले. तालिबानने या घटनेचा तीव्र निषेध करत अशा प्रकारचे हल्ले मानवतेविरुद्ध असल्याचे म्हटले आहे.

दरम्यान, पाकिस्तानने अफगाणिस्तानकडून करण्यात आलेले सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. पाकिस्तानमधील अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले की त्यांच्या लष्कराने कोणत्याही रुग्णालयावर किंवा नागरी ठिकाणावर हल्ला केलेला नाही. पाकिस्तानच्या म्हणण्यानुसार सोमवारी काबुल आणि पूर्व अफगाणिस्तानातील काही भागांमध्ये करण्यात आलेल्या कारवाईत नागरी भागांचे कोणतेही नुकसान झालेले नाही.

दोन्ही देशांकडून वेगवेगळे दावे केले जात असल्याने परिस्थिती अधिक गुंतागुंतीची बनली आहे. दरम्यान, या घटनेमुळे पाकिस्तान-अफगाणिस्तान संबंधांमध्ये तणाव आणखी वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावरही या घटनेकडे गंभीरतेने पाहिले जात असून परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवले जात आहे.

हेही वाचा: Mumbai Water Storage: मुंबईकरांसाठी धोक्याची घंटा? सातही धरणांमध्ये साठा निम्म्यापेक्षा कमी; पुढील काही महिने पाणी जपून वापरण्याचा इशारा

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number