मनोरंजनसृष्टीवर शोककळा! फिरायला म्हणून गेले अन् परतलेच नाहीत, प्रसिद्ध निर्मात्याने नदीत उडी मारून संपवलं आयुष्य

अग्निशमन आणि बचाव पथक घटनास्थळी पोहोचले, त्यांनी के. राजनचा मृतदेह बाहेर काढला आणि रुग्णालयात पाठवला.

मनोरंजनसृष्टीवर शोककळा! फिरायला म्हणून गेले अन् परतलेच नाहीत, प्रसिद्ध निर्मात्याने नदीत उडी मारून संपवलं आयुष्य

ज्येष्ठ तमिळ चित्रपट निर्माते के. राजन यांचे निधन झाले असून, यामुळे चित्रपटसृष्टीला मोठा धक्का बसला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, ८५ वर्षीय निर्मात्याने तमिळनाडूतील अड्यार नदीत उडी मारून आत्महत्या केली. नंतर त्यांचा मृतदेह बाहेर काढून रुग्णालयात नेण्यात आला. या घटनेने संपूर्ण तमिळ चित्रपटसृष्टीला धक्का बसला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, ते काही काळापासून आपल्या कुटुंबापासून दूर एकटेच राहत होते. अपघाताच्या दिवशी ते आपल्या चालकासोबत कारमधून प्रवास करत होते.

तामिळ वनइंडियाच्या वृत्तानुसार, के. राजनने चेन्नईतील अड्यार पुलावरून नदीत उडी मारली. अग्निशमन आणि बचाव पथक घटनास्थळी पोहोचले, त्यांनी के. राजनचा मृतदेह बाहेर काढला आणि रुग्णालयात पाठवला. पोलिसांनी या घटनेचा तपास सुरू केला आहे. वृत्तानुसार, जेव्हा के. राजनची कार अड्यार नदीच्या पुलाजवळ पोहोचली, तेव्हा त्याने चालकाला गाडी थांबवण्यास सांगितले. फिरायला जायचे आहे असे सांगून ते गाडीतून उतरले आणि नंतर अचानक नदीत उडी मारली.

हेही वाचा  – Rajanikanth On Thalapathy Vijay: 'विजय मुख्यमंत्री झाला म्हणून मत्सर…', तामिळनाडूच्या मुख्यमंत्र्यांबद्दल काय बोलून गेले रजनीकांत? 

के. राजन अनेकदा मुलाखतींमधून चित्रपटसृष्टीला भेडसावणाऱ्या समस्यांवर बोलत असत. त्यांच्या आकस्मिक निधनाने चित्रपटसृष्टीत मोठी खळबळ उडाली आहे. ते १९८० च्या दशकापासून तमिळ चित्रपटसृष्टीत सक्रियपणे सहभागी होते. त्यांनी १९८३ मध्ये सुरेश अभिनीत 'ब्रह्मचारिगल' या चित्रपटाद्वारे निर्माता म्हणून आपल्या कारकिर्दीला सुरुवात केली. त्यांनी त्यांच्या 'गणेश सिने आर्ट्स' या बॅनरखाली अनेक चित्रपटांची निर्मिती केली आणि अनेक चित्रपटांचे दिग्दर्शनही केले.

हेही वाचा – Ukraine Attack on Moscow: युक्रेनचा मॉस्कोवर भीषण हल्ला, एका भारतीयासह चार जणांचा मृत्यू

के. राजन हे ऑडिओ लाँच आणि सार्वजनिक कार्यक्रमांमधील त्यांच्या स्पष्टवक्त्या आणि निर्भीड भाषणांसाठी ओळखले जात होते. ते तमिळ चित्रपटसृष्टीतील संघर्ष, निर्मात्यांना होणारे आर्थिक नुकसान, कलाकारांचे वाढते मानधन आणि चित्रपटसृष्टीतील अनियमितता यांविरुद्ध वारंवार आवाज उठवत असत. त्यांच्या स्पष्टवक्तेपणामुळे अनेकदा वाद निर्माण झाले. मात्र, के. राजन यांच्या आत्महत्येमागील कारण सध्या अज्ञात आहे. पोलीस या घटनेचा सखोल तपास करत असून चालकाचीही चौकशी करत आहेत.
 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number