‘देश भ्रष्टाचारमुक्त करणे ही सीबीआयची जबाबदारी’

‘देशाला भ्रष्टाचारमुक्त करणे ही केंद्रीय तपास यंत्रणा (सीबीआयची) मुख्य जबाबदारी आहे. ही जबाबदारी पार पाडण्यासाठी सीबीआयला कुठेही आणि समोर कोण आहे, हे पाहून थांबण्याची गरज नाही, असे वक्तव्य पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हीरकमहोत्सवी कार्यक्रमात केले आहे.’ पंतप्रधान मोदी म्हणाले, सरकारने काळा पैसा, बेनामी मालमत्तेविरुद्ध धडक कारवाई करण्यात येत आहे. भ्रष्टचाऱ्यांविरोधात आम्ही लढा देणार आहोत. विकसित […]

‘देश भ्रष्टाचारमुक्त करणे ही सीबीआयची जबाबदारी’

‘देशाला भ्रष्टाचारमुक्त करणे ही केंद्रीय तपास यंत्रणा (सीबीआयची) मुख्य जबाबदारी आहे. ही जबाबदारी पार पाडण्यासाठी सीबीआयला कुठेही आणि समोर कोण आहे, हे पाहून थांबण्याची गरज नाही, असे वक्तव्य पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हीरकमहोत्सवी कार्यक्रमात केले आहे.’

पंतप्रधान मोदी म्हणाले, सरकारने काळा पैसा, बेनामी मालमत्तेविरुद्ध धडक कारवाई करण्यात येत आहे. भ्रष्टचाऱ्यांविरोधात आम्ही लढा देणार आहोत. विकसित भारताची निर्मिती व्यावसायिक आणि कार्यक्षम संस्थांशिवाय शक्य नाही, त्यामुळे देशाला भ्रष्टाचारमुक्त करण्याची मुख्य जबाबदारी सीबीआयची आहे, असे पंतप्रधान मोदी म्हणाले. तसेच लोकशाही आणि न्यायाच्या मार्गातील भ्रष्टाचार हा सर्वात मोठा अडथळा आहे, असेही पंतप्रधान मोदी म्हणाले.

‘सीबीआयच्या नवीन कार्यालयाचे उद्घाटन झाल्याने सीबीआयचे काम अधिक सोयीस्कर होईल. सीबीआय चौकशीच्या मागणीसाठी आंदोलनही केले जाता. तर एखादे गैरव्यवहाराचे प्रकरण सीबीआयकडे सोपवण्याचे अनेकांचे म्हणणे असते. त्यामुळे न्याय आणि न्यायाचा ब्रॅंड म्हणून सीबीआयचे नाव सर्वांच्या ओठी उमटते, अशा शब्दांत पंतप्रधान मोदी यांनी सीबीआयचे कौतुक केले.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number