OTT Watchlist | विकेंडला घरबसल्या काहीतरी नवीन आणि मनोरंजक पाहण्याचा प्लॅन आहे? मग तुमच्यासाठी OTT वर अनेक पर्याय उपलब्ध आहेत. OTT प्लॅटफॉर्मवर दररोज नवनवीन चित्रपट आणि वेब सीरिज रिलीज होत असतात. यंदाही विविध जॉनरमधील चित्रपट आणि वेब सीरिज प्रेक्षकांच्या भेटीला आले आहेत. घरबसल्या OTT वर काय पाहावे, असा प्रश्न अनेकांना पडतो. थरार, ड्रामा, ॲक्शन आणि मराठी मनोरंजनाचा आस्वाद घ्यायचा असेल, तर ही वॉचलिस्ट नक्की पाहा.
1. तुंबाडची मंजुळा ( Tumbadchi Manjula )
जर तुम्हाला हॉरर चित्रपटांची आवड असेल, तर 'तुंबाडची मंजुळा' हा तुमच्या वॉचलिस्टमध्ये असायलाच हवा. रहस्य, भीती आणि लोककथांचे मिश्रण असलेला हा मराठी चित्रपट ZEE5 वर उपलब्ध आहे. काहीतर नवीन अनुभवण्याची इच्छा असणाऱ्या प्रेक्षकांसाठी हा चित्रपट पाहण्यासारखा आहे.
2. ऑपरेशन सफेद सागर (Operation Safed Sagar)
कारगिल युद्धातील भारतीय हवाई दलाच्या पराक्रमावर आधारित ही सीरिज आहे. देशभक्ती, अॅक्शन आणि भावनिक प्रसंगांचा संगम असलेली ही सीरिज आहे. ही सीरिज 7 ऑगस्ट 2026 रोजी Netflix वर रिलीज झाली आहे. जर तुम्हाला देशभक्ती वरील सीरिज किंवा चित्रपट आवडत असेल तर हा नक्की पाहावा.
3. मैं वापस आऊंगा (Main Vaapas Aaunga)
'मैं वापस आऊंगा' हा दिग्दर्शक इम्तियाज अली यांचा चित्रपट आहे. नाती, प्रेम, आठवणी आणि आयुष्याच्या अनपेक्षित वळणांवर आधारित हा चित्रपट आहे. भावनिक आणि नातेसंबंधांवर आधारित हा चित्रपट प्रेक्षकांना गुंतवून ठेवतो. दिलजीत दोसांझ, शरवरी वाघ, वेदांग रैना आणि नसीरुद्दीन शाह यांच्या प्रमुख भूमिकेत असलेला हा चित्रपट Netflix वर पाहू शकतो.
4. द लास्ट हाऊस ( The Last House )
'द लास्ट हाऊस'' हा चित्रपट Netflix वर प्रदर्शित झालेला आहे. साय-फाय आणि थ्रिलरचा संगम असलेला हा चित्रपट सुरवातीपासून ते शेवटपर्यंत प्रेक्षकांना गुंतवून ठेवतो. जर तुम्ही थ्रिलर जॉनरचे चाहते असाल तर हा चित्रपट तुमच्या वॉचलिस्टमध्ये नक्कीच असायला हवा.
5. गट्टा कुस्ती 2 (Gatta Kusthi 2)
हा एक तमिळ स्पोर्ट्स कॉमेडी चित्रपट आहे. कुस्ती, नाती आणि कुटुंब यांच्यावर आधारित ही मनोरंजक कथा Netflix वर तुम्ही पाहू शकता. कॉमेडी, स्पोर्ट्स ड्रामा आणि भावनिक प्रसंगांमुळे हा चित्रपट प्रेक्षकांसाठी मनोरंजक ठरतो.
6. आवर स्टिकी लव्ह (Our Sticky Love)
'आवर स्टिकी लव्ह' हा रोमँटिक कॉमेडी K-Drama आहे. हा ड्रामा 7 ऑगस्ट 2026 रोजी Netflix वर प्रदर्शित झाला असून K-Drama चाहत्यांसाठी एक उत्तम पर्याय आहे. रोमान्स, कॉमेडी आणि थ्रिलरने भरलेला हा ड्रामा सध्या चर्चेत आहे. जर तुम्ही रोमँटिक कॉमेडी जॉनरचे चाहते असाल तर तुमच्यासाठी हा एक उत्तम पर्याय ठरू शकेल.