मुंबई, २९ एप्रिल २०२३, प्रतिनिधी :बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेता इरफान खानची शनिवारी निधनाला एक वर्ष पूर्ण झालं. इरफान खानचा मोठा चाहता वर्ग असून त्याचे समाज माध्यमांवर फॉलो करणाऱ्यांची संख्या आजही जास्त आहे. इरफानने भारतातच नाही तर परदेशातही अभिनयाची छाप उमटवली. २९ एप्रिल २०२० रोजी इरफान खानने जगाला अखेरचा निरोप दिला. इरफानच्या जाण्याने अभिनय क्षेत्रातील पोकळी न भरण्यासाठी आहे. इरफानच्या निधनाला शनिवारी दोन वर्ष पूर्ण झाले. दरम्यान, इरफानच्या पत्नीने त्यांच्या राहिलेल्या इच्छांचा खुलासा केला आहे.
प्रसिद्ध ज्येष्ठ अभिनेते अमिताभ बच्चन यांच्या आवाजाचे, व्यक्तिमत्त्वाचे जगभरात अनेक चाहते आहेत. दिवंगत इरफान खान हे बॉलिवूडमधील शेहनशाह अमिताभ बच्चन यांचे खूप मोठे चाहते होते. इरफानसाठी बचन्न जी म्हणजे देव. त्यांच्या प्रत्येक कलाकृतीवर इरफानचे प्रेम होते. अमिताभ यांच्या चित्रपटातील एका गाण्याने इरफानच्या मनात घर केलं. ते गाणं आपणही गायीलं पाहिजे अशी त्याची इच्छा होती. त्याच विषयी सुतापाने समाज माध्यमांवर एक पोस्ट सामायिक केली होती.पोस्टमध्ये त्यांनी लिहिले की, ‘आजही त्यांच्या आठवणीनं अर्ध्या रात्री झोपमोड होते.
फेसबुकवर आजही त्याच्या संदर्भातल्या आठवणींचा पूर ओसंडून वाहतोय. त्यामुळे मलाही इथं इरफानची एक अपूर्ण राहिलेली इच्छा आठवण म्हणून पोस्ट कराविशी वाटतेय. मला आठवतंय की आम्ही जेव्हा विद्यार्थी म्हणून शिकत होतो तेव्हापासून इरफान अमिताभ बच्चन यांच्या आवाजाचा फॅन होता. तो बच्चनजींचे बरेच संवाद हुबेहूब त्यांच्या शैलीत बोलून दाखवायचा. त्यानंतर सिनेसृष्टीत उत्तम अभिनेत्याचे पद मिळवल्यानंतरही एके रात्री त्यानं मला बोलून दाखवलं, मला बच्चनजींचं सिलसिला सिनेमातलं ‘तुम होती तो ऐसा होता’ हे गाणं एकदातरी सादर करायचंय. त्या नंतर त्याचं निधन झालं आणि त्याची ही इच्छा अपूर्णच राहिली, इरफान आपल्यातून निघून गेला’, अशी भावनिक पोस्ट त्यांनी केली होती.