अमेरिका-इस्त्रायल आणि इराण युद्धात (Iran Vs US Israel War) आतापर्यंत मोठ्या प्रमाणात जीवित आणि वित्तहानी झालीय. आखाती देशात दिवसरात्र बॉम्बचा वर्षाव होतोय. अमेरिका आणि इस्त्रायलच्या प्रत्येक हल्ल्याला इराण चोख प्रत्युत्तर देताना दिसतंय.या युद्धात इराणने घातक अशा बॉम्बचा वापर केल्याचा आरोप होतोय… तो बॉम्ब म्हणजे क्लस्टर बॉम्ब (Cluster Bomb). हा बॉम्ब इतका घातक का? आणि त्याचे परिणाम काय? हे जाणून घेऊयात.
क्लस्टर बॉम्ब हे क्षेपणास्त्राद्वारे डागले जातात. क्षेपणास्त्र (Missile) जमिनीवर आदळण्यापूर्वीच हवेतच फुटतं आणि त्यातून अनेक बॉम्ब बाहेर फेकले जातात. हे छोटे बॉम्ब मोठ्या क्षेत्रात पसरतात आणि अनेकदा लगेच फुटत नाहीत. नंतर लँडमाईनप्रमाणे अचानक स्फोट होतो. क्लस्टर बॉम्बमध्ये अचूकता नसली तरी मोठं नुकसान करतात, त्यामुळे मोठी जीवितहानी होण्याची शक्यता असते. ‘कन्व्हेन्शन ऑन क्लस्टर म्युनिशन्स’ (Convention on Cluster Munitions) कराराअंतर्गत 120 हून अधिक देशांमध्ये क्लस्टर बॉम्ब वापरावर बंदी आहे. मात्र इस्रायल, अमेरिका आणि इराण हे कराराचे सदस्य नाहीत. त्यामुळे या देशांवर कायद्याने बंदी लागू होत नाही. त्यामुळेच क्लस्टर बॉम्बचा वापर वाढला तर आखाती देशातील (Persian Gulf) संघर्ष आणखीन तीव्र होण्याची शक्यता आहे.