Iran America War: इराण-अमेरिका युद्धाचा भडका उडणार? खामेनींचा ट्रम्प यांना थेट इशारा, म्हणाले ‘कुणी त्रास दिला तर त्याला…’

अमेरिका-इराण तणावामुळे मध्यपूर्वेत युद्धाचे ढग दाटले असून, त्याचा जागतिक राजकारण व बाजारपेठेवर परिणाम होण्याची शक्यता आहे.

Iran America War: इराण-अमेरिका युद्धाचा भडका उडणार? खामेनींचा ट्रम्प यांना थेट इशारा, म्हणाले ‘कुणी त्रास दिला तर त्याला…’

तेहरान: मध्यपूर्वेच्या वाळवंटात पुन्हा एकदा युद्धाचा धुरळा उडण्याची चिन्हे दिसू लागली असून, जागतिक राजकारण एका अत्यंत स्फोटक वळणावर येऊन ठेपले आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणला दिलेल्या कडक इशाऱ्यानंतर आता इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनी यांनी ‘आरपारच्या लढाई’चे संकेत दिले आहेत. “जर अल्लाहची इच्छा असेल, तर अमेरिकेची ही अरेरावी आणि त्यांच्या कुरापतींचा अंत आता जवळ आला आहे,” अशा शब्दांत खामेनी यांनी ट्रम्प यांना थेट ललकारल्यामुळे संपूर्ण जगात खळबळ उडाली आहे.

12 तासांत दोनदा सज्जड दम: इराणचा बाणा कायम

गेल्या अवघ्या 12 तासांत खामेनी यांनी अमेरिकेला दोनदा लक्ष्य केले आहे. इराण कोणत्याही दबावापुढे झुकण्यास तयार नसल्याचे स्पष्ट करताना ते म्हणाले की, “इराण खंबीर होता आणि यापुढेही राहील. अमेरिकेने हे विसरू नये की, जर त्यांनी युद्धाची ठिणगी टाकली, तर त्याचा भडका केवळ इराणपुरता मर्यादित राहणार नाही. याचे रूपांतर एका भीषण प्रादेशिक युद्धात होईल.” ‘आम्ही कुणाला डिवचणारे नाही, पण आम्हाला कुणी त्रास दिला तर त्याला सोडणार नाही’ ही इराणची आक्रमक भूमिका सध्या व्हाईट हाऊसची झोप उडवणारी ठरत आहे.

हेही वाचा: Maharashtra Weather Update: अवकाळीचं संकट घोंगावतंय; ‘या’ जिल्ह्यांत पुन्हा पावसाची शक्यता, हवामान विभागाचा इशारा

लष्करप्रमुख आक्रमक; इस्रायलवरही निशाणा

राजकीय नेतृत्वापाठोपाठ इराणचे लष्करही आता पूर्णपणे ‘वॉर मोड’मध्ये आले आहे. तेहरानमधील एका विशेष कार्यक्रमात लष्करप्रमुख आमिर हातामी यांनी शत्रूच्या काळजात धडकी भरवणारा इशारा दिला. “इस्लामिक रिपब्लिक ऑफ इराणचे सैन्य आज युद्धासाठी सज्ज आहे. शत्रूच्या प्रत्येक हालचालीवर आमची करडी नजर असून आमची बोटं सध्या ट्रिगरवर आहेत. शत्रूने जर एखादी छोटी चूक जरी केली, तर ते स्वतःच्या आणि इस्रायलच्या विनाशाला आमंत्रण देतील,” असे हातामी यांनी निक्षून सांगितले.

दुसरीकडे, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे ‘दुहेरी चाल’ खेळताना दिसत आहेत. एका बाजूला ते इराणला लष्करी कारवाईचा धाक दाखवत आहेत, तर दुसरीकडे ‘चर्चेचे दार उघडे आहे’ असे सांगून मुत्सद्देगिरीचा आव आणत आहेत. “आम्ही कोणत्याही परिस्थितीचा सामना करण्यास सज्ज आहोत, पण चर्चेतून तोडगा निघाला तर उत्तम,” असे विधान ट्रम्प यांनी केले होते. मात्र, इराणने याला निव्वळ ‘दबावतंत्र’ ठरवत अमेरिकेची ही सौदेबाजी साफ धुडकावून लावली आहे.

जागतिक स्तरावर युद्धाचे सावट

इराणने थेट अमेरिकेसोबत इस्रायलचे नाव घेतल्याने या संघर्षाची व्याप्ती वाढण्याची शक्यता आहे. जर अमेरिकेने इराणवर हल्ला केला, तर इराण मध्यपूर्वेतील अमेरिकेच्या मित्रराष्ट्रांना लक्ष्य करेल, अशी भीती तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. या वाढत्या तणावामुळे आखाती देशांमध्ये युद्धाचे ढग दाटले असून, कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी वाढ होण्याची शक्यता आहे. परिणामी, जागतिक अर्थव्यवस्थेला पुन्हा एकदा महागाईचा मोठा फटका बसण्याची चिन्हे दिसत आहेत.

हेही वाचा: Jammu And Kashmir Earthquake: पहाटे गाढ झोपेत असतानाच बसले हादरे; देशातील ‘या’ ठिकाणी भूकंपाचे धक्के, घाबरून नागरिक घराबाहेर

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number