Iran US Talk: ‘अवास्तव आणि निरर्थक अटी!’; अमेरिकेच्या चर्चेच्या प्रस्तावावर इराण संतापला, पाहा काय घडलं?

इराणने अमेरिकेसोबतच्या युद्धविराम चर्चेत सहभागी होण्यास नकार दिल्याने इस्लामाबादमधील प्रस्तावित बैठक रद्द झाली आहे.

Iran US Talk: ‘अवास्तव आणि निरर्थक अटी!’; अमेरिकेच्या चर्चेच्या प्रस्तावावर इराण संतापला, पाहा काय घडलं?

अमेरिका आणि इराण यांच्यात सुरू असलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर युद्धविरामासाठीचे प्रयत्न सध्या ठप्प झाल्याचे चित्र समोर आले आहे. द वॉल स्ट्रीट जर्नल च्या अहवालानुसार, इराणने नियोजित चर्चेत सहभागी होण्यास स्पष्ट नकार दिला असून मध्यस्थीचे प्रयत्न अपयशी ठरत आहेत.

अहवालानुसार, इराणने मध्यस्थ देशांना कळवले आहे की ते आगामी काळात इस्लामाबाद येथे अमेरिकन अधिकाऱ्यांसोबत कोणतीही चर्चा करण्यास तयार नाहीत. तसेच अमेरिकेकडून मांडण्यात आलेल्या अटी “अस्वीकार्य” असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले आहे. त्यामुळे युद्धविरामाच्या दिशेने सुरू असलेल्या चर्चेला मोठा धक्का बसला आहे.

या घडामोडींमुळे पाकिस्तान च्या मध्यस्थी भूमिकेवरही परिणाम झाला आहे. पाकिस्तानने यापूर्वी अमेरिका-इराण चर्चेसाठी व्यासपीठ उपलब्ध करून देण्याची तयारी दर्शवली होती. पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री इशाक डार यांनीही देशाला अशा चर्चेचे यजमानपद मिळाल्यास चांगले वाटेल आणि ते संवाद सुलभ करण्यासाठी मदत करतील, असे म्हटले होते. मात्र, यामध्ये प्रगती न झाल्याने हा प्रस्ताव सध्या रखडला आहे.

हेही वाचा: Sunetra Pawar : जयची प्रमुखपदी नियुक्ती, तटकरे-पटेल यांची दिल्लीत भेट, तर दौऱ्यानंतर पहिला फोन उद्धव ठाकरेंना; उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांच्या राजकीय हालचालींना वेग

दरम्यान, डोनाल्ड ट्रम्प यांनी यापूर्वी अमेरिकेकडून इराणसोबत चर्चा सुरू असल्याचे संकेत दिले होते. “आम्ही चर्चेत चांगली प्रगती करत आहोत,” असे त्यांनी म्हटले होते. मात्र, त्यांनी याबाबत अधिक तपशील दिला नव्हता.

दुसरीकडे, इराणने स्पष्टपणे सांगितले आहे की पाकिस्तानमार्फत होणाऱ्या कोणत्याही चर्चेत ते सहभागी नाहीत. इराणचे प्रवक्ते इस्माईल बाघई यांनी सांगितले की, अमेरिकेसोबत थेट संवाद झालेला नाही. काही मध्यस्थांमार्फत अमेरिकेच्या “अवास्तव आणि चुकीच्या” मागण्या पोहोचवल्या गेल्या आहेत.

इराणला अमेरिकेकडून 15 मुद्द्यांचा प्रस्ताव देण्यात आला होता, मात्र तो “अवास्तव आणि निरर्थक” असल्याचे सांगत त्यांनी फेटाळला आहे. त्यांनी असेही नमूद केले की युद्ध संपणे सकारात्मक आहे, मात्र त्याची सुरुवात कोणी केली हे विसरता कामा नये. या पार्श्वभूमीवर मध्य पूर्वेतील तणाव कमी होण्याची शक्यता सध्या कमी असल्याचे संकेत मिळत आहेत. 

हेही वाचा: Gold Silver Rate Today: सोन्याचे दर स्थिर; पण चांदीच्या किमतीत 10900 रुपयांची मोठी घसरण, सोने-चांदीचे आजचे दर पाहा

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number