राज्य दहशतवाद विरोधी पथकाच्या प्रमुखपदी नवल बजाज यांची नियुक्ती

राज्य दहशतवाद विरोधी पथकाच्या प्रमुखपदी ज्येष्ठ आयपीएस अधिकारी नवल बजाज यांची नेमणूक करण्यात आली आहे.

राज्य दहशतवाद विरोधी पथकाच्या प्रमुखपदी नवल बजाज यांची नियुक्ती

मुंबई : राज्य दहशतवाद विरोधी पथकाच्या प्रमुखपदी ज्येष्ठ आयपीएस अधिकारी नवल बजाज यांची नेमणूक करण्यात आली आहे. १९९५ च्या भारतीय पोलिस सेवेच्या तुकडीचे अधिकारी असलेले नवल बजाज सध्या केंद्रात प्रतिनियुक्तीवर सीबीआयमध्ये सह-संचालकपदावर कार्यरत होते.

महाराष्ट्र केडरचे अधिकारी असलेल्या नवल बजाज यांनी यापूर्वी मुंबई पोलिसांच्या प्रशासन शाखेचे सह-आयुक्त म्हणून काम पाहिले आहे. तसेच, मुंबई पोलिसांच्या विशेष शाखेत अतिरिक्त आयुक्तपदाचा कार्यभारही सांभाळला आहे. सध्या बजाज राज्य दहशतवाद विरोधी पथकाचे काम पाहणार आहेत.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number