एका धोकादायक महामारीचे सावट पुन्हा एकदा जगावर घोंघावत असल्याचे दिसते. काही आफ्रिकन देशांमध्ये इबोला विषाणूच्या रुग्णांची संख्या वाढत असल्यामुळे, जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) जागतिक आरोग्य आणीबाणी जाहीर केली आहे. या वाढत्या जागतिक धोक्याला प्रतिसाद म्हणून भारत सरकारलाही सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
मोक्रॅटिक रिपब्लिक ऑफ काँगो आणि युगांडामध्ये इबोलाच्या रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेता, जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) 17 मे 2026 रोजी आंतरराष्ट्रीय आरोग्य नियमावली (IHR 2005) अंतर्गत याला जागतिक आरोग्य आणीबाणी म्हणून घोषित केले आहे.
केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाने भारतीय नागरिकांसाठी तातडीचा प्रवास सल्ला जारी केला आहे. आफ्रिका रोग नियंत्रण आणि प्रतिबंध केंद्राने (Africa Centers for Disease Control and Prevention) देखील इबोला विषाणूबाबत तीव्र इशारा दिला आहे.
भारताच्या आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाने एक प्रसिद्ध पत्रक जारी केले आहे. या पत्रकानुसार कांगो, युगांडा आणि दक्षिण सुडान या देशांत प्रवास करणे टाळावे, असे सांगण्यात आले आहे. ज्या भागात इबोलाच्या बुंडिबुग्यो या उपप्रकाराचा प्रसार ज्या देशांत झालेला आहे, तेथून एखादा प्रवासी आल्यास त्या प्रवाशाचा शोध घेणे, त्याची तपासणी करणे, या प्रवाशाबाबत रिपोर्ट करणे तसेच प्रतिबंध म्हणून काही खबरदारी घेणे या कृती करण्यात येतील असे सांगण्यात आले आहे. दरम्यान, भारतात सध्यातरी या इबोला व्हायरसच्या नव्या उपप्रकाराची लागण झालेला एकही रुग्ण आढललेला नाही. तरीदेखील भारतात खरदारी घेतली जात आहे.