जानेवारी महिन्यात महागाईचा झटका

नवीन वर्षातही नागरिकांच्या खिशाला झळ बसत आहे. जानेवारी २०२३ मध्ये महागाईचा दर वाढला आहे. सर्वसामान्यांना महागाईचा झटका बसला आहे. खाद्यपदार्थ आणि इंधन तसेच इतर वस्तू आणि सेवाही महागल्या आहेत. जानेवारी २०२३ मध्ये किरकोळ महागाईचा दर पुन्हा एकदा केवळ ६ टक्क्यांच्या पुढे गेला आहे. जानेवारी २०२३ मध्ये, किरकोळ महागाई दरात मोठी वाढ झाली असून हा दर […]

जानेवारी महिन्यात महागाईचा झटका

नवीन वर्षातही नागरिकांच्या खिशाला झळ बसत आहे. जानेवारी २०२३ मध्ये महागाईचा दर वाढला आहे. सर्वसामान्यांना महागाईचा झटका बसला आहे. खाद्यपदार्थ आणि इंधन तसेच इतर वस्तू आणि सेवाही महागल्या आहेत. जानेवारी २०२३ मध्ये किरकोळ महागाईचा दर पुन्हा एकदा केवळ ६ टक्क्यांच्या पुढे गेला आहे. जानेवारी २०२३ मध्ये, किरकोळ महागाई दरात मोठी वाढ झाली असून हा दर ६.५२ टक्क्यांवर पोहोचला आहे. तर डिसेंबर २०२२ मध्ये किरकोळ महागाई दर ५.७२ टक्के होता. जानेवारी २०२२ मध्ये किरकोळ चलनवाढीचा दर ६.०१ टक्के होता.

देशभरात सर्वसामान्यांना सर्वत्र महागाईचा फटका बसत आहे. एकीकडे पेट्रोल आणि डिझेलचे दर कमी होत नाहीत, तर दुसरीकडे दैनंदिन वापरातील वस्तूही महाग होत आहेत. दूध, साबण, टूथपेस्ट यांसारख्या दैनंदिन जीवनाशी निगडीत वस्तूंची किंमतही वाढताना दिसत आहे. जानेवारी २०२२ मध्ये या वस्तूंच्या किमती तीन ते २० टक्क्यांनी वाढल्या होत्या. त्यानंतर कच्च्या मालाच्या किमतीत ही दरवाढ वाढ झाल्याचं सांगण्यात आलं.

दूध आणि दुधापासून बनवलेल्या उत्पादनांचा महागाई दर ८.७९ टक्के आहे. मसालेही महागले आहेत आणि मसाल्यांचा महागाईचा दर २१.०९ टक्के आहे. तृणधान्ये आणि उत्पादनांचा महागाई दर १६.१२ टक्के आहे. मांस आणि माशांच्या महागाईचा दर 6.04 टक्के आहे, तर अंडीही महागली असून त्याच्या महागाईचा दर ८.७८ टक्के आहे. पालेभाज्या आणि भाज्यांचा महागाई दर घटला असून तो -११.७० टक्के आहे. फळांचा भाव २.९३ टक्के होता. डाळींच्या महागाईचा दर ४.२७ टक्के आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number