‘कोरोना काळात भारताच्या प्रयत्नांचे जगात कौतुक’ – पंतप्रधान मोदी

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संसदेत कोरोना काळातील केंद्र सरकारने केलेल्या कामांची यादी वाचून दाखवली. तसेच कोरोनाच्या संकट काळात भारताने केलेल्या प्रयत्नांचे जगभरात कौतुक होत असल्याचे पंतप्रधान म्हणाले. हे यश संपूर्ण देशाचे असल्याचे पंतप्रधान मोदी म्हणाले. कोरोना काळातील केंद्र सरकारने जनतेला केलेल्या सहकार्याची यादी मोठी आहे. लॉकडाऊन काळात केंद्र सरकारने गरिबांची चूल विझू दिली नाही, तर […]

‘कोरोना काळात भारताच्या प्रयत्नांचे जगात कौतुक’ – पंतप्रधान मोदी

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संसदेत कोरोना काळातील केंद्र सरकारने केलेल्या कामांची यादी वाचून दाखवली. तसेच कोरोनाच्या संकट काळात भारताने केलेल्या प्रयत्नांचे जगभरात कौतुक होत असल्याचे पंतप्रधान म्हणाले. हे यश संपूर्ण देशाचे असल्याचे पंतप्रधान मोदी म्हणाले.

कोरोना काळातील केंद्र सरकारने जनतेला केलेल्या सहकार्याची यादी मोठी आहे. लॉकडाऊन काळात केंद्र सरकारने गरिबांची चूल विझू दिली नाही, तर सरकारने ८० कोटी लोकांना नियमित शिधा दिला असल्याचे वक्तव्य पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले आहे. कोरोना काळात गरजूंच्या खात्यात रक्कम पोहचली, त्यामुळे केंद्र सरकारची नागरिकांना मिळालेली मदत कोरोनाकाळात आधार ठरली, असे पंतप्रधानांनी सांगितले. ५ कोटी ग्रामीण कुटुंबांना नळातून पाणी पुरवले तर ग्रामीण भागाला लॉकडाऊनपासून दूर ठेवण्यासाठी प्रयत्न केले. तसेच शेतकऱ्यांनी बंपर उत्पादन घेतले आणि भारताच्या अर्थव्यवस्थेला हातभार दिला, असे म्हणत पंतप्रधान मोदींनी शेतकऱ्यांचे आभार मानले.

कोरोना काळात देशातील मुख्यमंत्र्यांसोबत पंतप्रधानांनी सर्वाधिक २३ बैठका घेतल्या. तर केंद्र सरकारने ६४ हजार कोटींचा निधीवाटप राज्यांना केला आहे. तसेच नवीन रोजगार तरुणांना मिळत असून २०२१मध्ये १ कोटी २० लाख नोकऱ्या दिली असल्याची माहिती भविष्य निर्वाह निधी अंतर्गत उघड झाली आहे. प्रगत देश महामागाईच्या विळख्यात असून भारतात आम्ही महागाई नियंत्रणात ठेवली तसेच यूपीए  काळात महागाई दुहेरी आकड्यात असून आमच्या कार्यकाळात अर्थव्यवस्था विकास पथावर असल्याचे पंतप्रधान मोदी म्हणाले.

‘भारत जगात मोठा मोबाईल निर्माता’

कोरोनाकाळात भारताने उद्योघ क्षेत्र विस्तारले असून मोबाईल उत्पादनात भारत जगात पहिल्या क्रमांकावर आहे. ऑटोमोबाईल, बॅटरी निर्मितीमध्ये भारत अग्रगण्य आहे. कोरोनाकाळात इंजिनीयरिंग उत्पादनांची निर्यात वाढली आहे. त्यामुळे कोरोनाकाळात भारत धीराने सामोरे गेलो असल्याचे श्रेय देशवासियांचे आहे. त्यामुळे त्यांचे आभार मानतो, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number