Iran Seized Indian Ship: भारताची चिंता वाढली! होर्मुझमध्ये इराणने जप्त केलं भारतीय जहाज

इराणच्या 'इस्लामिक रिव्होल्युशनरी गार्ड कॉर्प्स'ने (IRGC) होर्मुझच्या सामुद्रधुनीतून (Strait of Hormuz) प्रवास करणाऱ्या दोन व्यापारी जहाजांना नियमांचे उल्लंघन केल्याचा ठप्पा ठेवत ताब्यात घेतले आहे.

Iran Seized Indian Ship: भारताची चिंता वाढली! होर्मुझमध्ये इराणने जप्त केलं भारतीय जहाज

Iran Seized Indian Ship: अमेरिका आणि इराण यांच्यातील राजनैतिक चर्चा फिस्कटल्यामुळे आखाती प्रदेशातील परिस्थिती अत्यंत स्फोटक बनली आहे. इराणच्या 'इस्लामिक रिव्होल्युशनरी गार्ड कॉर्प्स'ने (IRGC) होर्मुझच्या सामुद्रधुनीतून (Strait of Hormuz) प्रवास करणाऱ्या दोन व्यापारी जहाजांना नियमांचे उल्लंघन केल्याचा ठप्पा ठेवत ताब्यात घेतले आहे. विशेष म्हणजे, यातील एक जहाज थेट भारताच्या दिशेने येत होते. या कारवाईमुळे जागतिक तेल पुरवठा साखळी आणि सागरी सुरक्षेबाबत गंभीर प्रश्न निर्माण झाले आहेत.

जहाजांची ओळख आणि भारतावर होणारा परिणाम
'मरीन ट्रॅफिक'ने दिलेल्या माहितीनुसार, ताब्यात घेण्यात आलेल्या जहाजांमध्ये MSC-FRANCESCA आणि EPAMINONDAS यांचा समावेश आहे. यातील EPAMINONDAS हे जहाज दुबईतील 'जेबेल अली' बंदरावरून गुजरातच्या (भारत) दिशेने निघाले होते. ही जहाजे आता इराणच्या बंदरांकडे नेली जात आहेत. भारताकडे येणारे जहाज अडवले गेल्याने या तणावाचे सावट आता प्रादेशिक व्यापारी मार्गांवरही स्पष्टपणे दिसू लागले आहे. यामुळे भारताच्या ऊर्जा आयातीवर आणि व्यापारावर परिणाम होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

इशारा न देता गोळीबार आणि सागरी संघर्ष
युनायटेड किंगडम मेरिटाइम ट्रेड ऑपरेशन्सने (UKMTO) दिलेल्या अहवालानुसार, आज सकाळी 7:55 वाजता इराणच्या गनबोट्सनी लायबेरियन ध्वज असलेल्या एका जहाजावर कोणताही पूर्व इशारा न देता गोळीबार केला. सुदैवाने, या घटनेत कोणतीही जीवितहानी किंवा पर्यावरणीय नुकसान झालेले नाही. इराणने दाव्यांनुसार, जहाजांनी त्यांच्या इशाऱ्यांकडे दुर्लक्ष केले होते; मात्र पाश्चात्य सुरक्षा संस्थांनी हा दावा फेटाळून लावला आहे. केवळ गोळीबारच नाही, तर एका मालवाहू जहाजाला रोखण्यासाठी त्यावर थेट हल्लाही करण्यात आला.

हेही वाचा – Desh Garima: इराणचा गोळीबार झेलला, पण हार मानली नाही! भारतीय तेलवाहू जहाज 'देश गरिमा' मायदेशी सुखरूप परतलं

अमेरिका-इराण यांच्यातील लष्करी चढाओढ
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी युद्धविरामाला मुदतवाढ न देण्याचा निर्णय घेतल्यापासून इराणने आक्रमक पवित्रा घेतला आहे. दुसरीकडे, अमेरिका देखील या भागात निष्क्रिय राहिलेली नाही. अमेरिकेच्या लष्कराने यापूर्वी इराणचे एक कंटेनर जहाज जप्त केले होते, तसेच हिंद महासागरात इराणच्या तेल व्यापाराशी संबंधित एका तेलवाहू जहाजावर कारवाई केली होती. दोन्ही देश आता एकमेकांवर दबाव टाकण्यासाठी थेट लष्करी मार्गांचा अवलंब करत असल्याने जागतिक तेल बाजारपेठेत अस्थिरता निर्माण झाली असून तेलाच्या किमती वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number