Rupee Vs Dollar: डॉलर सुस्साट, रुपया कोमात; पहिल्यांदा गाठला 95.12 चा नीचांकी स्तर, कच्च्या तेलाचा भडका घसरणीमागे कारणीभूत

तज्ज्ञांच्या मते, ही घसरण तात्पुरती असून दीर्घकालीन गुंतवणुकीची संधी ठरू शकते.

Rupee Vs Dollar: डॉलर सुस्साट, रुपया कोमात; पहिल्यांदा गाठला 95.12 चा नीचांकी स्तर, कच्च्या तेलाचा भडका घसरणीमागे कारणीभूत

नवी दिल्ली: भारतीय रुपयातील घसरण थांबण्याचे नाव घेत नसून गुरुवार, 30 एप्रिल 2026 रोजी रुपया अमेरिकन डॉलरच्या तुलनेत नीचांकी पातळीवर पोहोचला आहे. सुरुवातीच्या व्यवहारातच रुपया 95.07 पर्यंत घसरला आणि 95.126 प्रति डॉलर या आतापर्यंतच्या सर्वात खालच्या स्तरावर पोहोचल्याने बाजारात चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.

या घसरणीमागे जागतिक स्तरावरील अनेक कारणांचा प्रभाव दिसून येतो. विशेषतः कच्च्या तेलाच्या वाढत्या किमती आणि अमेरिका-इराण यांच्यातील वाढता तणाव यामुळे रुपयावर मोठा दबाव आला आहे. भारत मोठ्या प्रमाणात कच्च्या तेलाची आयात करत असल्याने तेलाच्या किमती वाढल्या की डॉलरची मागणी वाढते आणि परिणामी रुपया कमकुवत होतो.

याशिवाय अमेरिकन फेडरल रिझर्व्ह च्या धोरणांचाही परिणाम दिसून येतो. फेडचे प्रमुख जेरोम पॉवेल यांच्या नेतृत्वाखालील बैठकीत व्याजदर स्थिर ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला. या निर्णयामुळे डॉलर आणि अमेरिकन बाँड यिल्ड मजबूत झाले, ज्याचा थेट परिणाम रुपयावर झाला.

यंदाच्या वर्षात आतापर्यंत रुपया सुमारे 5.8 टक्क्यांनी घसरला आहे. सलग तिसऱ्या आठवड्यात रुपयात घट नोंदवली गेली असून, आशियातील उदयोन्मुख अर्थव्यवस्थांमध्ये भारतीय चलनाची कामगिरी सर्वात कमकुवत ठरली आहे. काही काळासाठी रुपया 95.20 च्या जवळही पोहोचल्याचे दिसून आले.

हेही वाचा: Weather Update : मे महिन्याच्या सुरुवातीला हवामानात मोठे बदल! उष्माघातासह 'या' धोक्याची चाहूल

दरम्यान, भारताचे मुख्य आर्थिक सल्लागार अनंत नागेश्वरन यांनी या घसरणीकडे वेगळ्या दृष्टीकोनातून पाहिले आहे. त्यांच्या मते, सध्याची घसरण ही तात्पुरती असून रुपया सध्या वास्तविक मूल्यापेक्षा कमी म्हणजेच ‘कमजोर’ आहे. त्यामुळे दीर्घकालीन गुंतवणूकदारांसाठी ही एक चांगली संधी ठरू शकते. नागेश्वरन यांच्या मते, भारताच्या मजबूत आर्थिक पायाभूत सुविधांमुळे आणि भविष्यातील वाढीच्या शक्यतांमुळे रुपया पुन्हा सशक्त होण्याची पूर्ण शक्यता आहे. सध्याचा काळ हा गुंतवणुकीसाठी योग्य ठरू शकतो, असेही त्यांनी स्पष्ट केले.

एकूणच, जागतिक घडामोडींमुळे सध्या रुपयावर दबाव असला तरी दीर्घकालीन दृष्टीकोनातून भारतीय अर्थव्यवस्थेची ताकद कायम असल्याचे संकेत मिळत आहेत. त्यामुळे गुंतवणूकदारांनी अल्पकालीन चढउतारांपेक्षा दीर्घकालीन संधींकडे लक्ष देणे गरजेचे ठरणार आहे.

हेही वाचा: Jaykumar Gore : 'स्मशानभूमी सर्वांसाठी एकच'; जाती-धर्माच्या सीमा ओलांडून जयकुमार गोरे यांनी दिला समानतेचा मंत्र; ग्रामीण विकासासाठी उचलले मोठे पाऊल

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number