Indian Army Rules: Instagram वर नो लाईक, नो कमेंट! भारतीय सेनेकडून सोशल मीडिया नियमात महत्त्वाचा बदल

अलीकडेच चाणक्य डिफेन्स डायलॉग (Chanakya Defence Dialogue) मध्ये सेना प्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी  यांनीही सोशल मीडियाबाबत आपली भूमिका स्पष्ट केली होती.

Indian Army Rules: Instagram वर नो लाईक, नो कमेंट! भारतीय सेनेकडून सोशल मीडिया नियमात महत्त्वाचा बदल

नवी दिल्ली : भारतीय सेनेने (Indian Army) सोशल मीडियाच्या वापराबाबत आपल्या धोरणात महत्त्वाचा बदल केला आहे. सेनेशी संबंधित सूत्रांच्या माहितीनुसार, आता जवान आणि अधिकाऱ्यांना Instagram हे प्लॅटफॉर्म फक्त पाहण्यासाठी आणि निरीक्षणासाठी (Monitoring) वापरण्याची परवानगी देण्यात आली आहे. मात्र, पोस्ट करणे, लाईक देणे किंवा कमेंट करणे यावर बंदी कायम ठेवण्यात आली आहे. सोशल मीडियाशी संबंधित जुने सुरक्षा नियम पूर्वीप्रमाणेच लागू राहणार असून, हे निर्देश सेनेच्या सर्व युनिट्स आणि विभागांना देण्यात आले आहेत.

या बदलामागील मुख्य उद्देश म्हणजे जवानांना सोशल मीडियावर प्रसिद्ध होणारी माहिती पाहता यावी आणि तिच्यावर लक्ष ठेवता यावे. एखादी फसवी, भ्रामक किंवा संशयास्पद पोस्ट आढळल्यास, त्याची माहिती वरिष्ठ अधिकाऱ्यांपर्यंत पोहोचवता यावी, हा यामागचा हेतू आहे. यामुळे अफवा, दिशाभूल करणारी माहिती किंवा शत्रू देशांकडून चालवले जाणारे प्रचार प्रयत्न ओळखण्यास मदत होणार आहे.

खरं तर, सुरक्षा कारणांमुळे भारतीय सेना वेळोवेळी Facebook, X, Instagram यांसारख्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मच्या वापरावर निर्बंध आणत आली आहे. काही प्रकरणांमध्ये जवान परदेशी गुप्तचर संस्थांच्या हनी ट्रॅपमध्ये अडकल्याने संवेदनशील माहिती नकळत लीक झाल्याचे प्रकार समोर आले होते. त्यामुळेच हे नियम अधिक कडक करण्यात आले होते.

हेही वाचा: Delhi Court Verdict: मुंबई बॉम्बस्फोट प्रकरणाला मोठा ट्विस्ट; दिल्ली न्यायालयाकडून दोन आरोपींची मुक्तता

अलीकडेच चाणक्य डिफेन्स डायलॉग (Chanakya Defence Dialogue) मध्ये सेना प्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी  यांनीही सोशल मीडियाबाबत आपली भूमिका स्पष्ट केली होती. आजचा Gen Z तरुण सेनेत येऊ इच्छितो, पण सोशल मीडियापासून दूर राहण्याचे नियम त्याच्यासाठी कठीण ठरतात, या प्रश्नावर त्यांनी सविस्तर उत्तर दिले. स्मार्टफोन ही आजची गरज असल्याचे त्यांनी मान्य केले आणि जवानांना फोन वापरण्यास ते कधीच मनाई करत नसल्याचे स्पष्ट केले.

जनरल द्विवेदी म्हणाले की, फील्डमध्ये असलेल्या जवानांसाठी कुटुंबाशी संपर्क ठेवणे, मुलांचे फोटो पाहणे, पालकांची चौकशी करणे किंवा दैनंदिन गरजांसाठी स्मार्टफोन अत्यंत महत्त्वाचा आहे. मात्र, सोशल मीडियावर काय टाकायचे आणि काय टाकायचे नाही, याची स्पष्ट जाणीव असणे गरजेचे आहे, असेही त्यांनी ठामपणे सांगितले.

सोशल मीडियावरील ‘React’ आणि ‘Respond’ या दोन गोष्टींमधील फरकही त्यांनी अधोरेखित केला. त्वरित प्रतिक्रिया देणे म्हणजे React, तर विचारपूर्वक उत्तर देणे म्हणजे Respond. भारतीय सेना React करत नाही, तर Respond करते, हा संदेश शत्रूंना देणेही महत्त्वाचे असल्याचे त्यांनी नमूद केले. त्यामुळेच जवानांना सोशल मीडिया फक्त पाहण्यासाठी वापरण्याची मुभा देण्यात आली आहे.

यापूर्वी 2019 पर्यंत जवानांना कोणत्याही सोशल मीडिया ग्रुपचा भाग होण्यास परवानगी नव्हती. 2020 मध्ये नियम अधिक कडक करत Facebook आणि Instagramसह 89 मोबाईल अ‍ॅप्स हटवण्याचे आदेश देण्यात आले होते. मात्र, कठोर नियमांच्या चौकटीत Facebook, YouTube, X, LinkedIn, Quora, Telegram आणि WhatsApp यांसारख्या काही प्लॅटफॉर्मना मर्यादित वापराची परवानगी देण्यात आली आहे. सेनेचे अधिकृत सोशल मीडिया हँडल्स आधीपासूनच कार्यरत असून, Operation Sindoor दरम्यानही अधिकृत माहिती केवळ याच माध्यमातून देण्यात आली होती. नवीन नियमांमुळे माहिती मिळवणे शक्य असले तरी, सर्व सुरक्षा निर्देशांचे पालन करणे जवानांसाठी बंधनकारक राहणार आहे.

हेही वाचा: BMC Election 2026: भाजपची 'मेरिट' अट आणि शिंदेंचा 'आत्मसन्मान'; जागावाटपाचा तिढा सुटणार की वाढणार?

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number