राजस्थानमधील जैसलमेरजवळ भारतीय हवाई दलाच्या मिग-२१ या लढाऊ विमानाचा अपघात झाला आहे. या अपघातात विमानाचे पायलट विंग कमांडर हर्षित सिन्हा यांचा मृत्यू झाला आहे.
सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सॅम ठाणा परिसरातल्य डेझर्ट नॅशनल पार्कजवळ या विमानाचा अपघात झाला. तसेय या दुर्घटनेवर भारतीय हवाई दलाने निवेदन केले आहे. भारतीय हवाई दलाने एक ट्विट करत साडेआठ वाजता भारतीय हवाई दलाच्या मिग-२१ या विमानाच पश्चिम सेक्टरजवळ अपघात झाल्याचे म्हटले आहे. हवाई दलाच्यावतीने या अपघाताच्या घटनेच्या चौकशीचे आदेशही देण्यात आले आहेत.
गेल्या काही वर्षांमध्ये मिग-२१ विमानांच्या अपघाताच्या घटना सातत्याने घडत असून त्यामध्ये अनेक अधिकाऱ्यांना त्यांचा जीव गमवावा लागला आहे. २०१६पासून एकूण २४ मिग-२१ विमानांचा अपघात झाला आहे. सध्याचा विचार करता भारतीय हवाई दलात मिग-२१ विमानांचे सहा स्क्वॉड्रन आहेत. एका स्क्वॉड्रनमध्ये १८ विमाने असतात.