भारत-पाकिस्तान व्यापार संबंध; मर्यादित व्यवहार, वाढते तणाव

पाहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारत-पाकिस्तान संबंध पुन्हा तणावात; व्यापारी नात्यांवर फेरविचार सुरू.

भारत-पाकिस्तान व्यापार संबंध; मर्यादित व्यवहार, वाढते तणाव

नवी दिल्ली: भारत आणि पाकिस्तान हे शेजारी देश असूनही त्यांच्यातील राजकीय संबंध नेहमीच तणावपूर्ण राहिले आहेत. अलीकडेच जम्मू-काश्मीरमधील पाहलगाम येथे घडलेल्या दहशतवादी हल्ल्यामुळे पुन्हा एकदा दोन्ही देशांमध्ये तणावाची तीव्रता वाढली आहे. या घटनेत भारतीय नागरिकांना लक्ष्य करण्यात आले असून, यामुळे देशात संतापाची लाट पसरली आहे. भारताने या घटनेला उत्तर म्हणून पाकिस्तानसोबतच्या व्यापारी आणि राजनैतिक संबंधांवर पुन्हा विचार सुरू केला आहे. यापूर्वीही 2019 मध्ये पुलवामा हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानला दिलेला ‘मोस्ट फेवर्ड नेशन’ (MFN) दर्जा काढून घेतला होता आणि अनेक वस्तूंवरील व्यापार थांबवला होता. अशा घटना केवळ राजकीय नव्हे, तर आर्थिक पातळीवरही मोठे पडसाद उमटवतात.

सध्या काय स्थिती आहे?

भारत आणि पाकिस्तानमध्ये थेट व्यापारी संबंध अत्यंत मर्यादित स्वरूपात आहेत. सीमांवरील तणाव, आतंकवादाचा धोका, राजकीय मतभेद आणि दोन्ही देशांचे कठोर धोरण यामुळे व्यापारावर अनेक निर्बंध लादण्यात आले आहेत. तरीही काही निवडक वस्तूंचा व्यापार अजूनही सुरू आहे, जो मुख्यतः कृषी आणि औद्योगिक वस्तूंवर आधारित आहे.

पाकिस्तानकडून भारतात होणारी आयात: 

पाकिस्तानकडून भारतात खालील वस्तू मर्यादित प्रमाणात आयात केल्या जातात:

ड्रॉयफ्रूट (सुके मेवे)- अक्रोड, बदाम, खजूर यांचा समावेश.

टरबूज- काही हंगामांमध्ये भारतात मागणी असते.

सिमेंट- काही प्रकल्पांमध्ये वापर.

सेंधा मीठ (रॉक सॉल्ट)- पाकिस्तानी खाणीतून मिळणारे सेंधा मीठ भारतात लोकप्रिय.

भारताकडून पाकिस्तानमध्ये होणारी निर्यात: 

भारत पाकिस्तानला काही औद्योगिक व कृषी वस्तूंची निर्यात करतो:

दगड व चुनखडी -बांधकामासाठी आवश्यक साहित्य.

ऑप्टिकल वस्तू -चष्म्यासाठी आणि वैद्यकीय उपकरणांसाठी.

कापूस आणि स्टील -कपड्यांच्या निर्मितीसाठी व इतर औद्योगिक वापरासाठी.

सेंद्रिय रसायने आणि धातू संयुगं -शेती व उत्पादन प्रक्रियेत उपयुक्त.

चामड्याच्या वस्तू -बूट, बेल्ट, पर्स व इतर उत्पादनांसाठी.

भारत-पाकिस्तानमधील संबंध केवळ व्यापारी पातळीवर मर्यादित नाहीत, तर त्यामागे अनेक राजकीय, सामाजिक आणि सुरक्षा संबंधित बाबी आहेत. पाहलगामसारख्या घटनांमुळे विश्वासाचा संकट निर्माण होते आणि त्यामुळे व्यापारासारख्या सौम्य बाबींवरही परिणाम होतो. सध्या युद्धसदृश वातावरण असल्यामुळे भविष्यात व्यापारी संबंध आणखी कठोर होण्याची शक्यता आहे. 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number