Ethanol Fuel: पेट्रोलला रामराम? केंद्र सरकारचा मोठा निर्णय; आता इथेनॉल इंधनावर धावतील वाहने, खर्चही होणार कमी

केंद्र सरकारने E85 आणि E100 इंधनासाठी नवा आराखडा जाहीर केला आहे.

Ethanol Fuel: पेट्रोलला रामराम? केंद्र सरकारचा मोठा निर्णय; आता इथेनॉल इंधनावर धावतील वाहने, खर्चही होणार कमी

Ethanol Fuel: देशातील वाढत्या पेट्रोलच्या किमती, परदेशातून होणाऱ्या कच्च्या तेलाच्या आयातीवरील अवलंबित्व आणि पर्यावरणपूरक इंधनाची गरज लक्षात घेता केंद्र सरकारने मोठे पाऊल उचलले आहे. रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने केंद्रीय मोटार वाहन नियमांमध्ये बदल करण्यासाठी मसुदा अधिसूचना जारी केली असून E85 आणि E100 इंधनाला मान्यता देण्याचा मार्ग खुला झाला आहे. या निर्णयामुळे भविष्यात भारतात इथेनॉलवर चालणाऱ्या वाहनांचा वापर मोठ्या प्रमाणात वाढू शकतो.

काय आहे E85 आणि E100 इंधन?

इथेनॉल हे जैवइंधन असून ते प्रामुख्याने ऊस, मका, तांदूळ किंवा इतर कृषी उत्पादनांपासून तयार केले जाते. पेट्रोलपेक्षा हे अधिक पर्यावरणपूरक मानले जाते.

  • E85 म्हणजे 85 टक्के इथेनॉल आणि 15 टक्के पेट्रोल यांचे मिश्रण.

  • E100 म्हणजे पूर्णपणे शुद्ध इथेनॉल इंधन. यात पेट्रोलचा वापर होत नाही.

सरकार आता या इंधनांचा वापर अधिकृतरित्या वाढवण्याच्या तयारीत आहे.

हेही वाचा: Airplane Mode: 'कृपया तुमचे मोबाईल फोन एअरप्लेन मोडवर ठेवा'; विमान प्रवासात टेकऑफपूर्वी ही घोषणा का केली जाते?

सर्वसामान्यांना होणार मोठा फायदा

पेट्रोलच्या तुलनेत इथेनॉलचे उत्पादन कमी खर्चात करता येते. त्यामुळे भविष्यात E100 इंधनाचा दर प्रतिलिटर सुमारे 60 ते 70 रुपयांच्या आसपास राहू शकतो, असा अंदाज व्यक्त केला जात आहे. जर हे प्रत्यक्षात आले, तर वाहनधारकांच्या खिशाला मोठा दिलासा मिळू शकतो. दर महिन्याला पेट्रोलवर होणारा खर्च कमी झाल्यास मध्यमवर्गीय आणि रोज प्रवास करणाऱ्या नागरिकांना मोठा फायदा होणार आहे.

फ्लेक्स फ्युएल वाहनांवर भर

या नव्या योजनेचा लाभ घेण्यासाठी विशेष प्रकारच्या इंजिनची आवश्यकता असणार आहे. यांना फ्लेक्स फ्युएल इंजिन म्हटले जाते. अशी वाहने पेट्रोल, इथेनॉल किंवा दोन्ही मिश्रित इंधनावर चालू शकतात. सरकार वाहन उत्पादक कंपन्यांना अशा वाहनांच्या निर्मितीसाठी प्रोत्साहन देण्याची शक्यता आहे. त्यामुळे आगामी काळात बाजारात नवीन प्रकारची वाहने दिसू शकतात.

आयात खर्चात मोठी बचत

भारत मोठ्या प्रमाणात कच्चे तेल परदेशातून आयात करतो. यामुळे देशाच्या अर्थव्यवस्थेवर मोठा ताण येतो. पेट्रोलऐवजी इथेनॉलचा वापर वाढल्यास आयातीवरील खर्च कमी होऊ शकतो. याशिवाय शेतकऱ्यांनाही फायदा होणार आहे. कारण ऊस, मका आणि इतर पिकांपासून इथेनॉल तयार होत असल्याने कृषी क्षेत्रालाही चालना मिळेल.

हेही वाचा: RBI Recruitment 2026: RBI मध्ये अधिकारी होण्याची मोठी संधी; 60 जागांसाठी भरती जाहीर, दरमहा दीड लाखांपर्यंत मिळणार पगार; असा करा अर्ज

आधीच गाठले E20 लक्ष्य

भारताने पेट्रोलमध्ये 20 टक्के इथेनॉल मिश्रणाचे उद्दिष्ट मोठ्या प्रमाणात पूर्ण केले आहे. आता पुढचा टप्पा म्हणून E85 आणि E100 कडे सरकार वाटचाल करत आहे.

पर्यावरणासाठीही फायदेशीर

इथेनॉल जाळल्याने प्रदूषण कमी होते. त्यामुळे शहरांमधील वायूप्रदूषणावर नियंत्रण मिळवण्यासाठीही हा निर्णय महत्त्वाचा मानला जात आहे. पेट्रोलला पर्याय म्हणून इथेनॉलकडे पाहिले जात असून, भविष्यात भारतातील वाहन क्षेत्रात मोठा बदल दिसू शकतो. सरकारचा हा निर्णय सामान्य नागरिक, शेतकरी आणि पर्यावरण या तिन्हींसाठी फायदेशीर ठरण्याची शक्यता आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number