भारताने ऑस्ट्रेलियाला हरवले

भारतील क्रिकेट संघाने शनिवारी ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या कसोटीत एक डाव आणि १३२ धावांनी विजय मिळवला आहे. नागपूरच्या विदर्भ क्रिकेट असोसिएशन स्टेडियमवर झालेल्या या सामन्यात तिसऱ्याच दिवशी विजय मिळवत भारतीय संघाने चार सामन्यांच्या मालिकेत १-० अशी आघाडीही मिळवली आहे. भारतीय संघाने पहिल्या डावात २२३ धावांची भक्कम आघाडी घेतली होती. ऑस्ट्रेलियाला भारताची ही आघाडीही भरून काढता आली नाही. […]

भारताने ऑस्ट्रेलियाला हरवले

भारतील क्रिकेट संघाने शनिवारी ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या कसोटीत एक डाव आणि १३२ धावांनी विजय मिळवला आहे. नागपूरच्या विदर्भ क्रिकेट असोसिएशन स्टेडियमवर झालेल्या या सामन्यात तिसऱ्याच दिवशी विजय मिळवत भारतीय संघाने चार सामन्यांच्या मालिकेत १-० अशी आघाडीही मिळवली आहे.

भारतीय संघाने पहिल्या डावात २२३ धावांची भक्कम आघाडी घेतली होती. ऑस्ट्रेलियाला भारताची ही आघाडीही भरून काढता आली नाही. ऑस्ट्रेलियाचा संघ दुसऱ्या डावात ३२.३ षटकात ९१ धावांत सर्वबाद झाला. ऑस्ट्रेलियाकडून स्टीव्ह स्मिथ २५ धावांवर नाबाद राहिला. ऑस्ट्रेलियाच्या अन्य कोणत्याही फलंदाजाला २० धावांचा टप्पा ओलांडता आला नाही. भारताकडून दुसऱ्या डावात आर अश्विनने सर्वाधिक ५ विकेट्स घेतल्या. तसेच रविंद्र जडेजा आणि मोहम्मद शमीने प्रत्येकी २ विकेट्स घेतल्या, तर अक्षर पटेलने १ विकेट घेतली.

ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, भारतीय गोलंदाजांच्या शानदार गोलंदाजीसमोर त्यांना पहिल्या डावात केवळ १७७ धावा करता आल्या. ऑस्ट्रेलियाकडून या डावात मार्नस लॅब्युशेनने सर्वाधिक ४९ धावांची खेळी केली. भारताकडून रविंद्र जडेजाने सर्वाधिक ५ विकेट्स घेतल्या. तसेच आर अश्विनने 3 विकेट्स घेतल्या. त्याचबरोबर मोहम्मद शमी आणि मोहम्मद सिराजने प्रत्येकी १ विकेट घेतली.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number