बुधवारपासून राज्यात दुधाच्या खरेदीविक्री दरात वाढ

दूध खरेदी करताना ग्राहकांना आता जास्तीचे पैसे मोजावे लागणार आहेत. राज्यात बुधवारपासून दुधाच्या दरात वाढ झाली आहे. दूधाच्या खरेदीत तीन रुपयांनी तर विक्रीत दोन रुपयांनी वाढ झाली असल्याचा निर्णय राज्य सहकारी आणि खाजगी दूध उत्पादक संघाच्या बैठकीत घेण्यात आला आहे. ग्राहकांना प्रति लिटर दुधामागे आता दोन रुपये जास्त मोजावे लागणार आहेत. तसेच शेतकऱ्यांकडून जे दूध […]

बुधवारपासून राज्यात दुधाच्या खरेदीविक्री दरात वाढ

दूध खरेदी करताना ग्राहकांना आता जास्तीचे पैसे मोजावे लागणार आहेत. राज्यात बुधवारपासून दुधाच्या दरात वाढ झाली आहे. दूधाच्या खरेदीत तीन रुपयांनी तर विक्रीत दोन रुपयांनी वाढ झाली असल्याचा निर्णय राज्य सहकारी आणि खाजगी दूध उत्पादक संघाच्या बैठकीत घेण्यात आला आहे.

ग्राहकांना प्रति लिटर दुधामागे आता दोन रुपये जास्त मोजावे लागणार आहेत. तसेच शेतकऱ्यांकडून जे दूध खरेदी करतात त्या शेतकऱ्यांना तीन रुपये प्रतिलीटर वाढवून देण्यात येणार आहेत. हा निर्णय राज्य सहकारी आणि खाजगी दूध उत्पादक संघाच्या बैठकीत घेण्यात आला आहे.

या नव्या निर्णयामुळे आता गाईच्या दुधाचा खरेदीदर प्रतिलिटर ३३ रुपये तर, पिशवीबंद दुधाचा किरकोळ विक्री दर प्रतिलीटर ५२ रुपये असणार आहे. हा निर्णय अंमलबजावणी आजपासून होणार आहे. तर या निर्णयामुळे आता ग्राहकांच्या खिशाला कात्री लागणार आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number