नागपुरात नवीन कर्करोग रुग्णालयाचं लोकार्पण झालं. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांच्या हस्ते या कर्करोग रुग्णालयाचे लोकार्पण झालं. या कार्यक्रमाला महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी तसेच उद्योजक गौतम अदानी यांनी विशेष उपस्थिती दर्शवली. देवेंद्र फडणवीस हे या संस्थेचे मुख्य संरक्षक आहेत.
नागपुरातील जामठा येथे ४७० बेडचे उभारण्यात आलेले कर्करोग उपाचारावरील रुग्णालय हे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा ड्रीम प्रोजेक्ट आहे. या रुग्णालयात सर्व प्रकारच्या कर्करोगांवर उपचार करण्यात येणार आहे. धर्मादाय पद्धतीने कार्य करणारं हे देशातील सर्वात मोठं कर्करोग रुग्णालय आहे. तसेच कर्करोगाच्या रुग्णांना संजीवनी देणारी संस्था म्हणून या नवीन कर्करोग रुग्णालयाकडे पाहिले जाते.
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हे दोन दिवसांच्या नागपूर दौऱ्यावर होते. या दौऱ्या दरम्यान, अमित शाह नागपुरातील नवीन कर्करोग रुग्णालयाच्या लोकार्पण सोहळ्याला उपस्थित राहणार होते. मात्र, अमित शाह यांचा नागपूर दौरा रद्द झाला. पंजाबचे माजी मुख्यमंत्री प्रकाशसिंग बादल यांच्या मृत्यूमुळे पंजाबमध्ये दोन दिवसांचा दुखवटा जाहीर करण्यात आला आहे. याच पार्श्वभूमीवर अमित शाह यांचा नागपूरचा दौरा रद्द झाला.