Gen-Z protest : GEN-Z काय ऐकत नाही! श्रीलंका, बांगलादेश आणि नेपाळनंतर आता ‘या’ देशात GEN-Z ची खदखद; त्यांची मागणी काय?

श्रीलंका, बांगलादेश आणि नेपाळनंतर आता पुन्हा एकदा Gen-Z च्या आंदोलनाच्या वादळाने या देशाच्या राजकारणाला तडाखा बसला आहे. नेपाळनंतर मॅक्सिको सिटीमध्ये Gen-Z सरकारविरोधात रस्त्यावर उतरली आहे.

Gen-Z protest : GEN-Z काय ऐकत नाही! श्रीलंका, बांगलादेश आणि नेपाळनंतर आता ‘या’ देशात GEN-Z ची खदखद; त्यांची मागणी काय?

गेल्या काही महिन्यांपासून अनेक देशात Gen-Z च्या आंदोलनाने खळबळ माजवली आहे. देशात सुरु असलेल्या भ्रष्टाचाराविरोधात आवाज उठवून भ्रष्टाचाऱ्यांचा योग्य तो बंदोबस्त करण्यासाठी उचलेलं Gen-Z ने पाऊल अनेक देशात वेगळी भूमिका घेत आहे. श्रीलंका, बांगलादेश आणि नेपाळनंतर आता पुन्हा एकदा Gen-Z च्या आंदोलनाच्या वादळाने या देशाच्या राजकारणाला तडाखा बसला आहे. नेपाळनंतर मॅक्सिको सिटीमध्ये Gen-Z सरकारविरोधात रस्त्यावर उतरली आहे. यावेळी नॅशनल पॅलेससमोर आंदोलनकर्ते जमा झाले आहेत.

त्यांनी राष्ट्रपती भवनाला घेराव घातला असून पोलिस आणि सुरक्षा यंत्रणा मोठ्या प्रमाणात तैनात आहे. मात्र आंदोलकांची संख्या वाढत असल्याने चिंता वाढली आहे. काही दिवसांपूर्वी राष्ट्रपती क्लाऊडिया शीनबाम यांची भररस्त्यात एका दारुड्याने छेड काढली होती. त्यामुळे राष्ट्रपतीच सुरक्षित नाही तर सर्वसामान्य स्त्रीयांचे संरक्षण कोण करणार असा प्रश्न सरकारसमोर उपस्थित करण्यात आला होता. तसेच देशातील वाढती गुन्हेगारी, भ्रष्टाचार, अंमली पदार्थांची सर्रास विक्री आणि त्यातून होणारा हिंसाचार याविरोधात तेथील तरुणाई आक्रमक झाली आणि थेट रस्त्यावर उतरली.

यावेळी त्यांनी आंदोलन करत सरकारसमोर काही मागण्या उपस्थित केल्या. यामध्ये त्यांनी देशात भ्रष्टाचार, गुन्हेगारांवर वचक नसल्याने सर्वसामान्य त्रस्त झाल्याचा आरोप केला. त्याचसोबत 43 वर्षीय डॉक्टर अरिजबेथ गार्सिया यांनी सार्वजनिक सुरक्षेवर भर देण्यासाठी अधिक निधी आणि भरती प्रक्रिया राबविण्याची मागणी केली. देशात डॉक्टर सुद्धा सुरक्षित नसल्याचा आरोप त्यांनी केला. तसेच मिचोआकान शहरांचे महापौर कार्लोस मान्जो यांच्या हत्येनंतर तेथील ज्येष्ठ नागरिकांनी आणि अनेक राजकीय पक्षांनी देखील या Gen-Z च्या आंदोलनाला पाठिंबा दिला आहे.

मिचोआकान शहरांचे महापौर कार्लोस मान्जो यांनी शहरातील अंमली पदार्थांविरोधात तीव्र भूमिका घेतली होती. त्यामुळे त्यांच्या या भूमिकेवर संतापलेल्या ड्रग्समाफियांनी त्यांची हत्या केली. जनतेसाठी लढणाऱ्या नेत्याची हत्या झाल्याने तेथील तरुणाईने आणि ज्येष्ठ नागरिकांनी आक्रोश व्यक्त केला. या आंदोलनाच्या माध्यमातून मॅक्सिको सिटीतील तरुणाईने तेथील राष्ट्रापती शीनबाम यांच्या सुरक्षा धोरणावर कडाडून टीका केली आहे. मॅक्सिकोमध्ये Gen-Z चं आंदोलन सुरु होण्यापुर्वी नेपाळमध्ये तेथील तरुणाई तीव्र संतापली होती. त्यांच आंदोलन इतकं आक्रमक होत की, तेथील पंतप्रधानांसह अनेक नेत्यांना देश सोडून पळ काढावा लागला होता. तेथील तरुणाईने नेपाळच्या संसदेसह अनेक नेत्यांच्या घरांना आग लावली होती. इतकचं नव्हे तर तेथील नेत्यांना पळवून पळवून मारहाण देखील केली होती.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number