अमरावतीमध्ये पाण्यासाठी लोकांनी गाव सोडले

अमरावती जिल्ह्यातील चांदुर रेल्वे तालुक्यातील सावंगी मग्नापूर या गावात अनेकदा पाणीटंचाईचा प्रश्न उद्भवतो. दरम्यान, गेल्या २८ दिवसांपासून या गावात ग्रामपंचायतीने पाणी पुरवठा केला नाही. या परिस्थितीत घोटभर पाण्यासाठी ग्रामस्थांची तडफड होत आहे. त्यामुळे अमरावतीमध्ये पाण्यासाठी ग्रामस्थांनी गाव सोडण्याचा निर्णय घेतला आहे. गेल्या २८ दिवसांपासून ग्रामपंचायतीने अनुसूचित जातीच्या वस्तीत ग्रामस्थांना पाणीपुरवठा न केल्यामुळे गावकऱ्यांनी मध्यरात्रीपासून गाव […]

अमरावतीमध्ये पाण्यासाठी लोकांनी गाव सोडले

अमरावती जिल्ह्यातील चांदुर रेल्वे तालुक्यातील सावंगी मग्नापूर या गावात अनेकदा पाणीटंचाईचा प्रश्न उद्भवतो. दरम्यान, गेल्या २८ दिवसांपासून या गावात ग्रामपंचायतीने पाणी पुरवठा केला नाही. या परिस्थितीत घोटभर पाण्यासाठी ग्रामस्थांची तडफड होत आहे. त्यामुळे अमरावतीमध्ये पाण्यासाठी ग्रामस्थांनी गाव सोडण्याचा निर्णय घेतला आहे.

गेल्या २८ दिवसांपासून ग्रामपंचायतीने अनुसूचित जातीच्या वस्तीत ग्रामस्थांना पाणीपुरवठा न केल्यामुळे गावकऱ्यांनी मध्यरात्रीपासून गाव सोडून गावाबाहेर ठिय्या आंदोलन सुरू केले. त्यामुळे याप्रकरणी भाजपचे आमदार प्रताप अडसड यांनी गंभीर दखल घेत दोषीवर कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत.

गावात टाकण्यात आलेल्या पाण्याच्या पाईप लाईनमुळे त्या भागात योग्य पद्धतीने पाणी पुरवठा होत नसल्याची माहिती गटविकास अधिकारी यांनी दिला आहे. तसेच आम्हाला मुद्दाहून पाणी दिले जात नसल्याचा दुजाभाव होत असल्यामुळे आम्ही गाव सोडून जात आहोत, अशी प्रतिक्रिया नागरिकांनी दिली आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number