इम्रान खानला लाहोरमधून अटक

पाकिस्तान, ५ ऑगस्ट २०२३, प्रतिनिधी: पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांच्या अडचणी वाढल्या आहेत. इस्लामाबाद येथील एका ट्रायल कोर्टाने तोशाखाना प्रकरणात इम्रान खान यांना तीन वर्षांची शिक्षा सुनावली आहे. एक लाख रुपयांचा दंडही ठोठावण्यात आला आहे. इम्रान खान यांचा पक्ष पीटीआयने दावा केला आहे की, इम्रान खान यांना त्यांच्या जमान पार्क येथील घरातून अटक करण्यात […]

इम्रान खानला लाहोरमधून अटक

पाकिस्तान, ५ ऑगस्ट २०२३, प्रतिनिधी: पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांच्या अडचणी वाढल्या आहेत. इस्लामाबाद येथील एका ट्रायल कोर्टाने तोशाखाना प्रकरणात इम्रान खान यांना तीन वर्षांची शिक्षा सुनावली आहे. एक लाख रुपयांचा दंडही ठोठावण्यात आला आहे. इम्रान खान यांचा पक्ष पीटीआयने दावा केला आहे की, इम्रान खान यांना त्यांच्या जमान पार्क येथील घरातून अटक करण्यात आली आहे.

न्यायालयाच्या निर्णयानंतर इम्रान यांची राजकीय कारकीर्द अडचणीत आली आहे. पुढील ५ वर्षे त्यांना निवडणूक लढवता येणार नाही. इस्लामाबाद पोलिसांनी इम्रानविरोधात अटक वॉरंट जारी केले होते.

तोशाखाना हा पाकिस्तानमधील एक सरकारी विभाग आहे, जेथे इतर सरकारांचे प्रमुख, राष्ट्रपती, पंतप्रधान, खासदार, नोकरशहा आणि अधिकारी यांना परदेशी मान्यवरांनी दिलेल्या भेटवस्तू ठेवल्या जातात. पंतप्रधान असताना इम्रान खान यांच्यावर तोशाखान्यात ठेवलेल्या भेटवस्तू कमी किंमतीत खरेदी केल्याचा आणि नंतर नफा मिळवण्यासाठी त्या विकल्याचा आरोप होता.

२०१८ मध्ये, इम्रान खान यांना देशाचे पंतप्रधान म्हणून युरोप आणि विशेषतः अरब देशांच्या भेटीदरम्यान अनेक मौल्यवान भेटवस्तू मिळाल्या. अनेक भेटवस्तू इम्रान खान यांनी जाहीर केल्या नाहीत, तर अनेक भेटवस्तू मूळ किंमतीपेक्षा खूपच कमी किंमतीत विकत घेऊन बाहेर चढ्या भावाने विकल्या. याआधी पाकिस्तानच्या सर्वोच्च न्यायालयाने तोशाखाना प्रकरणात दिलासा मागणारी इम्रान खान यांची याचिका फेटाळून लावली होती. पाकिस्तान तेहरीक-ए-इन्साफ (पीटीआय) पक्षाचे प्रमुख इम्रान यांनी तोशाखान्यातून ठेवलेल्या भेटवस्तूंचा तपशील जाणूनबुजून लपवल्याचा आरोप आहे. आरोप सिद्ध झाल्यानंतर ट्रायल कोर्टाने निकाल दिला आहे.

यापूर्वी इस्लामाबाद उच्च न्यायालयाने या प्रकरणात दिलासा नाकारल्यानंतर इम्रान खान यांना सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. तिथूनही दिलासा मिळाला नाही. पाकिस्तानच्या निवडणूक आयोगाने मागील वर्षी २१ ऑक्टोबर रोजी माजी पंतप्रधानांना तोशाखाना प्रकरणात खोटी विधाने आणि खोटी घोषणा केल्याबद्दल अपात्र ठरवले होते.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number