‘भाजपचा विजय झाला असे मी मानत नाही’

भाजपने छोट्या पक्षाच्या आणि अपक्ष आमदारांना आमिषं दाखवली. ज्याप्रमाणे आमची मतं बाद करण्यात आली त्याचप्रमाणे भाजपाची मते बाद करण्यासाठी आम्ही निवडणूक आयोगाला पत्र लिहीले होते पण त्यांनी भाजपाला झुकते माप दिले. काहींवर केंद्रीय तपास यंत्रणांचा दबाव आणण्यात आला. काही ठिकाणी इतर काही व्यवहार झाले असल्याचा आरोप निकालानंतर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केला आहे. राज्यसभा […]

‘भाजपचा विजय झाला असे मी मानत नाही’

भाजपने छोट्या पक्षाच्या आणि अपक्ष आमदारांना आमिषं दाखवली. ज्याप्रमाणे आमची मतं बाद करण्यात आली त्याचप्रमाणे भाजपाची मते बाद करण्यासाठी आम्ही निवडणूक आयोगाला पत्र लिहीले होते पण त्यांनी भाजपाला झुकते माप दिले. काहींवर केंद्रीय तपास यंत्रणांचा दबाव आणण्यात आला. काही ठिकाणी इतर काही व्यवहार झाले असल्याचा आरोप निकालानंतर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केला आहे.

राज्यसभा निवडणूक निकालीची मतमोजणी शनिवारी पहाटे संपली. यामध्. मविआने 3 जागा आणि भाजपाने 3 जागा जिंकल्या. महाराष्ट्रातील राज्यसभेच्या 6 जागांसाठी शिवसेनेने 2, काँग्रेसने आणि राष्ट्रवादीने प्रत्येती 1 उमेदवार निवडणुकीसाठी उभा केला होता. भाजपने 3 उमेदवार निवडणुकीसाठी उभे केले होते.या निवडणुकीत शिवसेनेचे संजय राऊत, काँग्रेसचे इम्रान प्रतापगडी, राष्ट्रवादीचे प्रफुल्ल पटेल हे विजयी झाले. तर, भाजपाचे अनिल बोंडे, पियुष गोयल आणि धनंजय मुंडे विजयी झाले आहेत. राज्यसभा निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर संजय राऊत यांनी माध्यमांशी संवाद साधला आहे.

यावेळी राऊत म्हणाले की पहिल्या पसंतीची सर्वाधिक मते शरद पवार यांना मिळाली, दुसऱ्या पसंतीच्या आकडेमोडीवर महाडिक विजयी झाले. त्यांनी एक जागा जिंकली परंतू असे चित्र निर्माण केले जणू मोठा विजय झाला आहे. परंतू असे काही नाहिये. काही अपेक्षित मते आम्हाला मिळाली नाही हे मात्र खरे आहे. दोन चार मते पुढे मागे झाली मात्र ती मते कोणती आहे आम्हाला माहित आहे. आमच्या सर्व नेत्यांनी संजय पवारांनी जिंकावे म्हणून शर्तीचे प्रयत्न केले आहे. काही अपक्ष आणि इतर पक्षांच्या आमदारांना आमिष दाखवून मते मिळवली तर, काही ठिकाणी केंद्रीय तपास यंत्रणाचा वापर करण्यात आला आहे. त्यामुळे भाजपाचा उमेदवार जिंकला आहे. पण मी भाजप जिंकले आहे असं मानत नाही.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number