मी ब्राह्मण नाही, पण…, तेजश्री प्रधानची प्रतिक्रिया

मराठीतील मालिकांमध्ये प्रमुख भूमिकेत ब्राह्मण मुली दिसतात, असं वक्तव्य‘केसरी’चित्रपटाचा दिग्दर्शक सुजय डहाकेने एका मुलाखतीमध्ये केलं होतं. यानंतर या प्रकरणी विविध क्षेत्रातून संमिक्ष प्रतिक्रिया उमटताना दिसत आहेत. दरम्यान या प्रकरणी प्रसिद्ध अभिनेत्री तेजश्री प्रधान यांनी प्रतिक्रिया दिली आहे. सोशल मीडियाद्वारे तेजश्रीने आपली प्रतिक्रिया दिली आहे. काय म्हणाली तेजश्री प्रधान ? मी ब्राह्मण नाही. तरी माझ्याकडे काम […]

मी ब्राह्मण नाही, पण…, तेजश्री प्रधानची प्रतिक्रिया

मराठीतील मालिकांमध्ये प्रमुख भूमिकेत ब्राह्मण मुली दिसतात, असं वक्तव्य‘केसरी’चित्रपटाचा दिग्दर्शक सुजय डहाकेने एका मुलाखतीमध्ये केलं होतं.

यानंतर या प्रकरणी विविध क्षेत्रातून संमिक्ष प्रतिक्रिया उमटताना दिसत आहेत. दरम्यान या प्रकरणी प्रसिद्ध अभिनेत्री तेजश्री प्रधान यांनी प्रतिक्रिया दिली आहे. सोशल मीडियाद्वारे तेजश्रीने आपली प्रतिक्रिया दिली आहे.

काय म्हणाली तेजश्री प्रधान ?

मी ब्राह्मण नाही. तरी माझ्याकडे काम आहे. मी ब्राह्मण नाही बरं ! सीकेपी आहे. परंतु अनेक वर्ष माझ्याकडे काम आहे. याला टॅलेंट म्हणूया का ? अशी पोस्ट तेजश्री प्रधानने केली आहे.

सुजय डहाकेच्या या विधानानंतर सोशल मीडियावर या वक्तव्याचं समर्थन तसंच विरोध देखील केला जात आहे. जाती जातीत तेढ निर्माण करण्याचं काम केलं जात असल्याचंही सोशल मीडियावर म्हटंल जात आहे.

या प्रकरणी अभिनेता शशांक केतकरने आपली भूमिका मांडली आहे. तरुण दिग्दर्शकांनी असं बोलावं, अशी अपेक्षा नसल्याचं शंशाक म्हणाला. तसेच त्याने कामावर लक्ष द्याव, असाही सल्ला शशांक केतकरने दिला आहे.

दरम्यान तेजश्री प्रधानचा बबलू बॅचलर हा सिनेमा २० मार्चला प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number