HSRP बाबत मोठी अपडेट; हे काम न केल्यास मिळणार नाही PUC , तसेच भरावा लागेल मोठा दंड

15 एप्रिलपासून तुम्हाला पीयूसी मिळणार नाही असं समोर आलं आहे. 

HSRP बाबत मोठी अपडेट; हे काम न केल्यास मिळणार नाही PUC , तसेच भरावा लागेल मोठा दंड

वाहनधारकांना HSRP नंबर प्लेट लावणं बंधनकारक केले आहे.  एचएसआरपी नंबरप्लेट नसल्यास तुम्हाला वाहनाची पीयूसी मिळणार नाहीये. त्यामुळे वाहनधारकांचे टेन्शन वाढणार आहे. 15 एप्रिलपासून तुम्हाला पीयूसी मिळणार नाही असं समोर आलं आहे. 

 त्यामुळे तुम्ही जर अजूनही नंबरप्लेट बसवली नसेल तर लगेच बसवून घ्या. तुम्ही घरबसल्या मोबाईलवरुन एचएसआरपी नंबरप्लेटसाठी बुकिंग करु शकतात.नवीन नियम 15 एप्रिलपासून सागू होणार आहे. उत्तर प्रदेशसह अनेक राज्यांमध्ये हे नियम लागू होणार आहेत. ज्या वाहनांना एचएसआरपी नंबरप्लेट नसेल त्यांना दंडदेखील भरावा लागणार आहे.

हेही वाचा – India-Iran Relations: 'भारतीय जहाजांना सुरक्षित मार्ग देऊ, कोणतेही शुल्क आकारलं जाणार नाही…'; होर्मुझ संकटावर इराणी राजदूताचं मोठं विधान 

त्याशिवाय एचएसआरपी नंबर प्लेट नसल्यास गाडीशी संबंधित आरटीओची कामे, विम्याचे नूतनीकरण आणि कागदपत्रांची पडताळणी अशा महत्त्वाच्या कामांमध्ये अडथळे येऊ शकतात. त्यामुळे आर्थिक दंड वाचवण्यासाठी आणि शेवटच्या क्षणाची घाई टाळण्यासाठी वेळीच नंबर प्लेट बदलून घ्या.

हेही वाचा – RBI Action On Cooperative Bank: RBI चे 'या' बॅंकेवर कठोर निर्बंध; 6 महिने व्यवहार राहणार ठप्प, ठेवीदारांमध्ये अस्वस्थता 

तुमच्या वाहनाला अद्याप एचएसआरपी नंबर प्लेट नसेल, तर तुम्हाला मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागू शकते. 17 एप्रिलनंतर ज्या वाहनांवर एचएसआरपी नंबर प्लेट नसेल, अशा वाहनांना प्रदूषण नियंत्रण प्रमाणपत्र  दिले जाणार नाही. 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number