फुटीरतावादी नेता यासिन मलिकला जन्मठेपाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. पतियाळा न्यायालयाने यासिन मलिकला शिक्षा सुनावली असून मलिकला जन्मठेपाच्या शिक्षेसह १० लाख रुपयांचा दंड ठोठावला आहे. शिक्षा सुनावल्यानंतर मलिकची रवानगी तिहार तुरुंगात करण्यात आली आहे.
दरम्यान, यासिन मलिक तिहार तुरुंगात खितपत पडेल अशी शक्यता निर्माण झालीय. त्याला दोन प्रकरणांत जन्मठेप झालीय तर, दहशतवाद प्रतिबंधक कायद्यांतर्गत १७ कालमाअंतर्गत १० लाख रुपयांचा दंड आणि अन्य आठ प्रकरणात ६५ हजार असा एकूण दंड १० लाख ६५ हजार रुपये दंड ठोठावण्यात आला आहे.
कलम १२० ब अनुसार १० वर्ष तुरुंगवास १० हजार दंड
कलम १२१ अ अनुसार १० वर्ष तुरुंगवास १० हजार दंड
१८ UAPA कलमांतर्गत १० वर्ष तुरुंगवास १० हजार
१५ UAPA कलमांतर्गत १० वर्ष तुरुंगवास १० हजार
१३ UAPA कलमांतर्गत ५ वर्ष तुरुंगवास ५ हजार
३८ UAPA कलमांतर्गत ५ वर्ष तुरुंगवास ५ हजार
३९ UAPA कलमांतर्गत ५ वर्ष तुरुंगवास ५ हजार
काश्मीर मधला फुटीरतावादी अतिरेकी.
यासिनकडून १९८४ साली ‘ताला पार्टी’ची स्थापना.
मकबूल भटच्या फाशीला विरोध केल्याने यासिनला अटकेत.
तुरुंगातून सुटल्यावर ताला पार्टीचे इस्लामिक स्टुडन्ट लीग असे नामांतर.
१९८७ – मुस्लिम युनाइटेड फ्रंटच्या माध्यमातून विधानसभा निवडणुकांचा.