हिंगणघाटला अवकाळी पावसाचा फटका

ऐन उन्हाळाच्या दिवसांत वर्ध्या जिल्ह्यातील हिंगणघाटा अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे. हिंगणघाटात अवकाळी पाऊस पडल्यामुळे कृषी उत्पन्न बाजारातील लाखोंचा शेतमाल भिजला असल्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. तसेच येनोरा शिवारात वीज पडून गुराख्याचा मृत्यू झाला आहे. हिंगणघाट शहरात बुधवारी सायंकाळी अचानक जोरदार पावसाने हजेरी लावली, वादळ वाऱ्यासह आलेल्या या पावसाने शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान केले […]

हिंगणघाटला अवकाळी पावसाचा फटका

ऐन उन्हाळाच्या दिवसांत वर्ध्या जिल्ह्यातील हिंगणघाटा अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे. हिंगणघाटात अवकाळी पाऊस पडल्यामुळे कृषी उत्पन्न बाजारातील लाखोंचा शेतमाल भिजला असल्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. तसेच येनोरा शिवारात वीज पडून गुराख्याचा मृत्यू झाला आहे.

हिंगणघाट शहरात बुधवारी सायंकाळी अचानक जोरदार पावसाने हजेरी लावली, वादळ वाऱ्यासह आलेल्या या पावसाने शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान केले आहे. यावेळी शेतकऱ्यांनी विक्रीसाठी आणलेले तूर, सोयाबीन आणि चण्याचे धान्य पूर्णपणे भिजल्याने शेतकऱ्यांची चांगलीच तारांबळ उडाली आहे.

कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात शेतकऱ्यांनी चना, तूर, आणि सोयाबीन विक्रीसाठी मोठ्या प्रमाणात आणले होते. ते शेतकऱ्यांनी खुल्या जागी ठेवले होते. काही धान्याचा लिलाव झाला होता, तर काही विक्रीकरिता ठेवला होता, अशातच अचानक पावसाच्या जोरदार सरी बरसल्याने खरेदी केलेल्या धान्याच्या व्यापाऱ्यांचेही नुकसान झाले. तर शेतकऱ्यांनाही मोठे नुकसान सोसावे लागले आहे. हिंगणघाट तालुक्यातील येनोरा शिवारात शेतात वीज पडल्याने एका गुरख्याचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. सुहास बाजीराव येरखेडे असे या गुरख्याचे नाव आहे. तर अजनसरा परिसरात अवकाळी पावसासह गारपीट झाली आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number