ढगफुटीमुळे मुसळधार पाऊस, जमीन खचली, २४ तासांत २९ मृत्यू

उत्तर भारतात निसर्ग सौंदर्याने नटलेल्या उत्तराखंड आणि हिमाचल प्रदेश या २ राज्यांमध्ये पावसाने धुमाकूळ घातला आहे. मागील २४ तासांत मुसळधार पाऊस आणि जमीन खचणे, दरड कोसळणे अशा घटना घडल्या. या घटनांमुळे २९ जणांचा मृत्यू झाला. मृतांच्या संख्येत वाढ होण्याची भीती व्यक्त होत आहे. उत्तराखंडमधील अनेक नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली आहे. हिमाचल प्रदेशला पावसाचा दणका उत्तराखंडमध्ये […]

ढगफुटीमुळे मुसळधार पाऊस, जमीन खचली, २४ तासांत २९ मृत्यू

उत्तर भारतात निसर्ग सौंदर्याने नटलेल्या उत्तराखंड आणि हिमाचल प्रदेश या २ राज्यांमध्ये पावसाने धुमाकूळ घातला आहे. मागील २४ तासांत मुसळधार पाऊस आणि जमीन खचणे, दरड कोसळणे अशा घटना घडल्या. या घटनांमुळे २९ जणांचा मृत्यू झाला. मृतांच्या संख्येत वाढ होण्याची भीती व्यक्त होत आहे. उत्तराखंडमधील अनेक नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली आहे.

हिमाचल प्रदेशला पावसाचा दणका

उत्तराखंडमध्ये पुन्हा हाहाकार

जोरदार पावसामुळे हिमाचल प्रदेशमधील ७५२ रस्ते बंद झाले आहेत. कुल्लू आणि मंडी या २ भागांना जोडणाऱ्या रस्त्यावरील वाहतूक ठप्प झाली आहे. चंदीगड – मनाली राष्ट्रीय राजमार्ग आणि मंडी – कटौला – बजौरा यांना जोडणारे रस्ते पण बंद झाले आहेत. चंदिगड – शिमला – मनाली फोरलेन ३ ठिकाणी जमीन खचल्यामुळे बंद आहे. ठिकठिकाणी झाडे पडल्यामुळे रस्ते बंद पडले आहेत.

उत्तराखंडमधील चमोली जिल्ह्यातील पीपलकोटीत ढगफुटी झाली. यामुळे अनेक गाड्या वाहून गेल्या. नगर पंचायत पीपलकोटीचे कार्यालय वाहून गेले. डेहराडून डिफेन्स कॉलनीची इमारत कोसळली. सततच्या पावसामुळे चारधाम यात्रा ठप्प झाली आहे.

हवामान विभागाने उत्तराखंड आणि हिमाचल प्रदेश या राज्यांना जोरदार पावसाचा इशारा दिला होता. हा इशारा खरा ठरला. डेहराडून, पौडी, टिहरी, नैनिताल, यूएसनगर, चंपावत या जिल्ह्यांमध्ये जोरदार पाऊस पडला. सोमवारी सकाळी शिमला येथील समरहिल परिसरातील शंकराच्या मंदिराजवळ दरड कोसळली. दरड कोसलल्यामुळे मंदिर परिसरात ३० जण अडकले. अडकलेल्यांपैकी ९ जणांचा मृत्यू झाला. मदतकार्यात गुंतलेल्या पथकाने मंदिर परिसरातून ९ मृतदेह बाहेर काढले आहेत. सध्या शंकराच्या मंदिराजवळ एनडीआरएफ और एसडीआरएफ यांनी मदतकार्य सुरू केले आहे. हिमाचल प्रदेशचे मुख्यमंत्री सुखविंदर सिंह सुक्खू यांनी मदतकार्याचा आढावा घेतला. भारतीय जनता पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी सुक्खू यांच्याशी फोनवरून बातमीत केली आणि सुरू असलेल्या मदतकार्याचा आढावा घेतला.

मंडी जिल्ह्यात नैसर्गिक आपत्तींमुळे १३ मृत्यू झाले आहेत. सोलन जिल्ह्यात ७ जणांचा मृत्यू झाला. सोलन जिल्ह्यात एक गोशाळा आणि २ घरे वाहून गेली. तसेच सोलन जिल्ह्यातील कंडाघाटमधील जादोन गावात ढगफुटी झाल्यामुळे पूर आला.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number