पुण्यामध्ये मुसळधार पावसाला सुरुवात

राज्याच्या अनेक भागात १८ मार्चपर्यंत जोरदार पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली होती. अनेक ठिकाणी पावसाने जोरदार हजेरी लावली असून अनेक ठिकाणी ढगाळ वातावरण आहे. दरम्यान चार नंतर पुणे शहर आणि परिसरातही मेघगर्जनेसह मुसळधार पावसाला सुरुवात झाली आहे. पुण्यामध्ये अनेक ठिकाणी झाडे पडलेली देखील घटना घडलेल्या समोर येत आहेत. या पावसामुळे नागरिकांची चांगलीच तारांबळ उडाल्याचे […]

पुण्यामध्ये मुसळधार पावसाला सुरुवात

राज्याच्या अनेक भागात १८ मार्चपर्यंत जोरदार पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली होती. अनेक ठिकाणी पावसाने जोरदार हजेरी लावली असून अनेक ठिकाणी ढगाळ वातावरण आहे. दरम्यान चार नंतर पुणे शहर आणि परिसरातही मेघगर्जनेसह मुसळधार पावसाला सुरुवात झाली आहे. पुण्यामध्ये अनेक ठिकाणी झाडे पडलेली देखील घटना घडलेल्या समोर येत आहेत. या पावसामुळे नागरिकांची चांगलीच तारांबळ उडाल्याचे चित्र बघायला मिळाले. त्याच्यामुळे पुण्यामध्ये पुण्यामध्ये येत्या चार दिवसांमध्ये विजेच्या कडकड्यात सह जोरदार पाऊस होण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवलेली आहे

तर रायगड, सातारा, सांगली, कोल्हापूर, परभणी, औरंगाबाद, नाशिक, जालना, हिंगोली, लातूर या भागात देखील पुढील काही तासात पाऊस पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे नागरिकांनी घराबाहेर पडताना खबरदारी घेण्याचे आवाहन हवामान विभागामार्फत करण्यात आले आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number