सायलीचा आगळावेगळा दागिना पाहिलात का ?

मुंबई, 4 मे २०२३, प्रतिनिधी :झी मराठी वाहिनी वरील ‘काहे दिया परदेस’ या गाजलेल्या मालिकेतून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री म्हणजे सायली संजीव.मालिकेच्या माध्यमातून सायलीने अल्पावधीत लोकप्रियता मिळवली. त्यामुळे आज तिने मालिकांसह सिनेमांमध्येही काम केलं आहे. आपल्या सोज्वळ सौंदर्यानं आणि दमदार अभिनयानं सायली संजीव हिनं मनोरंजन विश्वामध्ये स्वतःचं असं स्थान निर्माण केलं. बस्ता चित्रपटासोबत गोष्ट एका पैठणीची […]

सायलीचा आगळावेगळा दागिना पाहिलात का ?

मुंबई, 4 मे २०२३, प्रतिनिधी :झी मराठी वाहिनी वरील ‘काहे दिया परदेस’ या गाजलेल्या मालिकेतून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री म्हणजे सायली संजीव.मालिकेच्या माध्यमातून सायलीने अल्पावधीत लोकप्रियता मिळवली. त्यामुळे आज तिने मालिकांसह सिनेमांमध्येही काम केलं आहे. आपल्या सोज्वळ सौंदर्यानं आणि दमदार अभिनयानं सायली संजीव हिनं मनोरंजन विश्वामध्ये स्वतःचं असं स्थान निर्माण केलं. बस्ता चित्रपटासोबत गोष्ट एका पैठणीची हा चित्रपट देखील चांगलाच गाजला असून या चित्रपटाला तर राष्ट्रीय पुरस्कारदेखील मिळाला.त्या नंतर सायली अनेकदा पैठणी नेसताना दिसून येते तर सायलीने नुकतेच तिचे काही पारंपरिक लूक मधले काही फोटोज सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

त्यात तिने हिरव्या रंगाची पारंपरिक साडी नेसली असून केसात गजरे आणि गळ्यात हटके दागिने घातलेले पाहायला मिळतायत. या दागिन्यांमध्ये दिसणाऱ्या त्या सोन्याच्या आकर्षक दागिन्यानं सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे.या दागिन्यांचं नेमकं नाव काय आहे असा प्रश्न चाहत्यांना पडला आहे. तर या दागिन्याला सरी असे म्हणतात हा दागिना जुना दागिना म्हणून जास्त ओळखला जातो. सध्याच्या दागिन्यांमध्ये सरी हा दागिना ट्रेंडिग दागिन्यांमध्ये निवडला जातो.सायलीच्या फोटोवर अनेकांनी लाईक्सचा वर्षाव केलेला पाहायला मिळतोय सायलीच्या कामाबद्दल बोलायचं झालं तर सायलीने ‘सातारचा सलमान’, ‘एबी आणि सीडी’, ‘मन फकिरा’, ‘दाह’, ‘बस्ता’, ‘झिम्मा’, ‘हर हर महादेव’, ‘उर्मी’ या सिनेमांमध्ये काम केलं आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number