हरियाणातील सिरसा येथे एका लग्नसोहळ्याचे चित्रीकरण करत असताना भरधाव वेगाने येणाऱ्या कारने धडक दिल्याने एक फोटोग्राफर हवेत फेकला गेला आणि त्यात त्याचा जागीच मृत्यू झाला. या संपूर्ण घटनेचे सीसीटीव्ही फुटेज समोर आले आहे.
नेमकं काय घडलं?
आज सकाळी सिरसा येथे एका विवाह सोहळ्यानंतर डोली (पालखी) सोडताना अपघात झाला. काल रात्री हिसार रोडवरील एका रिसॉर्टमध्ये विवाह सोहळा पार पडला होता आणि आज सकाळी वधूला निरोप देत असताना हा भीषण अपघात घडला. विवाह सोहळ्याचे छायाचित्रण करणाऱ्या फोटोग्राफर्सपैकी एक 25 वर्षीय तरुण चुकून रस्त्यावर आला.
दरम्यान, भरधाव वेगाने येणाऱ्या एका कारने छायाचित्रकाराला धडक दिली आणि त्याला काही फूट हवेत फेकले, ज्यामुळे त्याचा जागीच मृत्यू झाला. मृत मलकीत उर्फ अजय कुमार हा सिरसा येथील अभोली गावचा रहिवासी असल्याचे सांगितले जात आहे. कारचालक फतेहाबादचा आहे. पोलीस घटनास्थळी दाखल झाले, त्यांनी चालक आणि कारला ताब्यात घेतले आणि मृतदेह शवविच्छेदनासाठी सिरसाच्या सिव्हिल हॉस्पिटलमध्ये पाठवला. पोलिसांनी चालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू केला आहे.
Sirsa Photographer Accident | लग्नाचे शूटिंग करत असताना भरधाव कारने उडवले… हरियाणाच्या हिसार रोडजवळ सिरसा बस स्थानकाजवळील दुर्घटना… अपघाताचे सीसीटीव्ही फुटेज सोशल मीडियावर व्हायरल…#Photographer #SirsaAccident #Haryana pic.twitter.com/F1GxgDt0Ac — Harshal Jadhav (@harshal_rj) April 23, 2026