Hantavirus: नव्या विषाणूमुळे जगभरात चिंता! 2 भारतीयांना हंताव्हायरसची लागण; उपचारासाठी थेट नेदरलँड्सला हलवलं

एमव्ही होंडियस क्रूझ जहाजावर हंताव्हायरसच्या संशयित संसर्गामुळे खळबळ उडाली आहे.

Hantavirus: नव्या विषाणूमुळे जगभरात चिंता! 2 भारतीयांना हंताव्हायरसची लागण; उपचारासाठी थेट नेदरलँड्सला हलवलं

जगभरात पुन्हा एकदा नव्या विषाणूची चर्चा सुरू झाली असून ‘एमव्ही होंडियस’ या डच क्रूझ जहाजावर हंताव्हायरसच्या संशयित संसर्गामुळे खळबळ उडाली आहे. या जहाजावरील काही कर्मचाऱ्यांमध्ये संसर्गाची लक्षणे आढळल्यानंतर आरोग्य यंत्रणा सतर्क झाली असून दोन भारतीय क्रू मेंबर्सना उपचार आणि विलगीकरणासाठी नेदरलँड्समध्ये हलवण्यात आले आहे. या संदर्भात मॅड्रिडमधील भारतीय दूतावासाने माहिती दिली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, ‘एमव्ही होंडियस’ हे जहाज स्पेनच्या कॅनरी बेटांच्या किनाऱ्याजवळ थांबले होते. जहाजावर विविध देशांतील एकूण 147 लोक उपस्थित होते. त्यामध्ये 59 क्रू मेंबर्सचा समावेश होता. काही कर्मचाऱ्यांना ताप, श्वास घेण्यास त्रास आणि पोटदुखीसारखी लक्षणे जाणवू लागल्यानंतर तपासणी करण्यात आली. त्यावेळी हंताव्हायरस संसर्गाची आठ संशयित प्रकरणे समोर आली होती. त्यापैकी पाच जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याची माहिती समोर आली आहे.

हेही वाचा: Underwater Internet Cables: होर्मुझमध्ये इराणची 'डिजिटल नाकेबंदी'; इंटरनेट वापरासाठी आता जगाला मोजावे लागणार पैसे?

या घटनेत आतापर्यंत तिघांचा मृत्यू झाल्याचेही सांगितले जात आहे. मृतांमध्ये एका पुरुषाचा समावेश असून त्याला सुरुवातीला ताप आणि डोकेदुखीचा त्रास जाणवत होता. नंतर त्याची प्रकृती गंभीर बनली आणि त्याचा मृत्यू झाला. त्याच्या संपर्कात आलेल्या एका महिलेलाही नंतर त्रास सुरू झाला. विमान प्रवासादरम्यान तिची तब्येत खालावली आणि काही दिवसांनी तिचा मृत्यू झाला. आणखी एका महिलेचा न्यूमोनियामुळे मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे.

स्पेनमधील भारतीय दूतावासाने सांगितले की, जागतिक आरोग्य संघटना आणि स्थानिक प्रशासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार जहाजावरील सर्व प्रवाशांना सुरक्षितपणे खाली उतरवण्यात आले आहे. दोन भारतीय नागरिकांना विशेष वैद्यकीय देखरेखीखाली नेदरलँड्समध्ये पाठवण्यात आले असून त्यांना क्वारंटाईन करण्यात येणार आहे.

हेही वाचा: Turkish Airlines Plane : विमानात पुन्हा आगीची घटना; काठमांडू विमानतळावर लँडिंगच्या वेळी तुर्की एअरलाइन्सच्या विमानाला आग

या घटनेनंतर जागतिक आरोग्य संघटना देखील सतर्क झाली असून परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवले जात आहे. हंताव्हायरसचा प्रसार मर्यादित असला तरी खबरदारी घेण्याचे आवाहन आरोग्य तज्ज्ञांकडून करण्यात आले आहे. दरम्यान, जहाजावरील इतर प्रवाशांचीही तपासणी सुरू असून पुढील काही दिवस परिस्थिती महत्त्वाची ठरणार आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number