White House Attack : मोठी बातमी! ट्रम्प यांच्या व्हाईट हाऊसवर पुन्हा गोळीबार; घटनास्थळी 25 राऊंड फायर

अमेरिकेची राजधानी वॉशिंग्टन, डी.सी येथे आज रविवारी पहाटे गोळीबाराची घटना घडली आहे. गोळीबाराच्या वेळी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प हे तिथेच उपस्थित होते अशी माहिती समोर आली आहे.

White House Attack : मोठी बातमी! ट्रम्प यांच्या व्हाईट हाऊसवर पुन्हा गोळीबार; घटनास्थळी 25 राऊंड फायर

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या अधिकृत निवासस्थानाजवळ असलेले व्हाईट हाऊस परिसरात पुन्हा एकदा हादरले आहे. अमेरिकेची राजधानी वॉशिंग्टन, डी.सी येथे आज रविवारी पहाटे गोळीबाराची घटना घडली आहे. गोळीबाराच्या वेळी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प हे तिथेच उपस्थित होते अशी माहिती समोर आली आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, शनिवारी तिथे काम करणाऱ्या पत्रकारांना 25 गोळ्या झाडल्याचा आवाज ऐकू आले.

हेही वाचा- US Green Card Policy : ग्रीन कार्डबाबत ट्रम्प प्रशासनाचा धक्कादायक निर्णय; अमेरिकेत राहून अर्ज करण्यावर कडक निर्बंध

शनिवारी संध्याकाळी 17 व्या स्ट्रीट आणि पेनसिल्व्हेनिया अव्हेन्यू भागात एका व्यक्तीने आपल्या बॅगमधून शस्त्र काढले आणि गोळीबार सुरू केला. गोळीबार करणाऱ्या संशयितावर अमेरिकेच्या सिक्रेट सर्व्हिसच्या कर्मचाऱ्यांनी प्रत्युत्तरादाखल गोळीबार केला.

यात संशयित हल्लेखोराला देखील गोळी लागली आणि त्याला तातडीने रुग्णालयात हलवण्यात आले मात्र उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. यावेळी या गोळीबारात एका रस्त्यावरून जाणाऱ्या व्यक्तीला गोळी लागली आहे. ती व्यक्ती जखमी असून तिच्यावर उपचार सुरू आहेत. या घटनेनंतर काही काळ परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number