Earthquake: अवघ्या पाऊण तासात 8 वेळा हादरली जमीन; ‘या’ देशात 6.3 रिश्टर स्केलचा शक्तिशाली भूकंप

या भूकंपांमधील सर्वात भीषण धक्का हा 6.3 रिश्टर स्केल तीव्रतेचा नोंदवला गेला असून, त्याचे केंद्र जमिनीच्या आत साधारण 10 किलोमीटर खोलीवर होते.

Earthquake: अवघ्या पाऊण तासात 8 वेळा हादरली जमीन; ‘या’ देशात 6.3 रिश्टर स्केलचा शक्तिशाली भूकंप

Earthquake: चीनच्या वायव्य (नॉर्थ-वेस्ट) भागाला भूकंपाचा अत्यंत तीव्र फटका बसला आहे. किंघाई प्रांतामध्ये अवघ्या 40 मिनिटांच्या कालावधीत तब्बल 8 मोठे भूकंपाचे धक्के जाणवले. या भूकंपांमधील सर्वात भीषण धक्का हा 6.3 रिश्टर स्केल तीव्रतेचा नोंदवला गेला असून, त्याचे केंद्र जमिनीच्या आत साधारण 10 किलोमीटर खोलीवर होते. या सलगच्या धक्क्यांमुळे संपूर्ण परिसरात नागरिकांमध्ये घबराटीचे वातावरण निर्माण झाले असून, स्थानिक प्रशासनाने तातडीने आणीबाणीच्या उपाययोजना सुरू केल्या आहेत.

खाणकाम तात्काळ रोखण्याचे आदेश; एकाचा मृत्यू  

दरम्यान, 'ग्लोबल टाईन्स' या चिनी वृत्तपत्राने दिलेल्या वृत्तानुसार, मंगळवारी स्थानिक वेळेनुसार संध्याकाळी 6:40 च्या सुमारास ही नैसर्गिक आपत्ती ओढवली. भूकंपाचे मुख्य केंद्र किंघाई प्रांताची राजधानी शियांगपासून 567 किलोमीटर अंतरावर होते. प्राथमिक अहवालानुसार, या दुर्घटनेत एका नागरिकाचा मृत्यू झाला असून अन्य चार जण जखमी झाले आहेत. सुरक्षेचा उपाय म्हणून प्रशासनाने एक मोठा निर्णय घेत, परिसरातील सर्व कोळसा खाणींमधील काम तातडीने थांबवून कामगारांना सुरक्षित ठिकाणी बाहेर पडण्याचे आदेश दिले आहेत.

हेही वाचा – Strait of Hormuz Dispute: 'होर्मुझ सामुद्रधुनीतून जाण्यासाठी शुल्क द्यावं लागेल…'; डोनाल्ड ट्रम्प यांच्या दाव्यावर इराणची स्पष्ट भूमिका

मदत आणि बचाव पथके युद्धपातळीवर तैनात; नुकसानीचा अंदाज घेणे सुरू

भूगर्भ तज्ज्ञांच्या मते, हा संपूर्ण परिसर तिबेट पठाराच्या सीमेवर असल्याने भौगोलिकदृष्ट्या अत्यंत संवेदनशील आणि भूकंपप्रवण क्षेत्र मानला जातो. मात्र, इतक्या कमी वेळेत सलग आठ मोठे धक्के बसण्याची ही दुर्मिळ घटना असल्याने चिंता व्यक्त होत आहे. परिस्थितीचे गांभीर्य ओळखून सरकारने बचावकार्यासाठी विशेष वाहने आणि 10 तज्ज्ञ जवानांचे पथक रवाना केले आहे. भूकंपामुळे झालेल्या एकूण वित्तहानी आणि जीवितहानीचा अचूक अंदाज घेण्याचे काम सध्या सुरू असून, त्यानंतरच पुढील मदतकार्याची दिशा ठरवली जाणार आहे. मुसब्बर यंत्रणा सध्या हायअलर्ट मोडवर असून कोणत्याही कठीण प्रसंगाला सामोरे जाण्यासाठी सज्ज असल्याचे स्थानिक प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number