‘महाराष्ट्रात मद्य विकास आघाडीचे सरकार’ – तुषार भोसले

  राज्यसरकारने आयात केलेल्या स्कॉच व्हिस्कीवरील (विदेशी मद्य) उत्पादान शुल्कात ५० टक्के कपात केली आहे. या निर्णयामुळे भाजपने महाविकास आघाडीवर टीका केली आहे. महाराष्ट्रातील महाविकास आघाडी सरकार हे मद्य विकास आघाडी सरकार असल्याची टीका भाजप आध्यात्मिक समन्वय आघाडीचे प्रदेशाध्यक्ष तुषार भोसले यांनी केली आहे.   १ लीटर विदेशी मद्याच्या दरात आता ३० ते ४० टक्के […]

‘महाराष्ट्रात मद्य विकास आघाडीचे सरकार’ – तुषार भोसले

  राज्यसरकारने आयात केलेल्या स्कॉच व्हिस्कीवरील (विदेशी मद्य) उत्पादान शुल्कात ५० टक्के कपात केली आहे. या निर्णयामुळे भाजपने महाविकास आघाडीवर टीका केली आहे. महाराष्ट्रातील महाविकास आघाडी सरकार हे मद्य विकास आघाडी सरकार असल्याची टीका भाजप आध्यात्मिक समन्वय आघाडीचे प्रदेशाध्यक्ष तुषार भोसले यांनी केली आहे.

  १ लीटर विदेशी मद्याच्या दरात आता ३० ते ४० टक्के कपात करण्यात आली आहे. त्यामुळे आयात केलेल्या या विक्रितून महाराष्ट्र सरकारला वार्षिक १०० कोटी रुपयांचा महसूल मिळतो. त्यामुळे महाराष्ट्रात मद्य विकास आघाडीचे सरकार असल्याची टीका भाजपाने केली आहे.

  भाजप आध्यात्मिक समन्वय आघाडीचे प्रदेशाध्यक्ष तुषार भोसले यांनी ट्विट करत महाविकास आघाडीवर निशाणा साधला आहे. ‘ज्ञानोबा-तुकोबांच्या महाराष्ट्रात फक्त आता व्यसनी लोकांसाठीच निर्णय घेतले जात आहेत. एकीकडे शेतकऱ्यांचे हाल, एसटी कर्मचारी संपावर, पेट्रोल-डिझेलला कोणताही सवलत नाही पण दारूला मात्र विशेष सवलत सातत्याने दिली जात आहे’, त्यामुळे हे महाविकास आघाडीचे सरकार नाही तर मद्य विकास आघाडीचे सरकार असल्याचे सिद्ध झाले असल्याचे तुषार भोसले म्हणाले.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number