Fraud Call Alert: सावधान! बँकेच्या नावाने येणाऱ्या फेक कॉल्सचा आता गेम ओव्हर; Google चं नवीन फिचर तुम्हाला फसवणूक होण्यापासून कसं वाचवणार?

या फीचरमुळे बँक किंवा सरकारी नंबरच्या नावाने येणारे फसवे कॉल आधीच ओळखता येतील आणि वापरकर्त्यांना कॉल उचलण्यापूर्वीच इशारा मिळू शकतो.

Fraud Call Alert: सावधान! बँकेच्या नावाने येणाऱ्या फेक कॉल्सचा आता गेम ओव्हर; Google चं नवीन फिचर तुम्हाला फसवणूक होण्यापासून कसं वाचवणार?

Google लवकरच Android वापरकर्त्यांसाठी एक महत्त्वाचे सुरक्षा फीचर आणण्याच्या तयारीत आहे. या नवीन फीचरमुळे बँक, सरकारी हेल्पलाइन किंवा इतर अधिकृत क्रमांकांच्या नावाने येणाऱ्या फसव्या कॉल्सची ओळख पटवणे सोपे होणार आहे. भारतासारख्या देशांमध्ये बनावट कॉल्सची समस्या वाढत असल्याने हे फीचर लाखो वापरकर्त्यांसाठी मोठा दिलासा ठरू शकते.

आजकाल सायबर गुन्हेगार अशा नंबरवरून कॉल करतात जे पाहताना अगदी बँक किंवा सरकारी कार्यालयाचे अधिकृत नंबर वाटतात. अनेक लोक अशा कॉलवर विश्वास ठेवून फसवणुकीला बळी पडतात. गुगल आता “Verified Caller” नावाचे नवीन सिस्टम तयार करत असून ते थेट Google Play Services चा भाग असेल. त्यामुळे हे फीचर फक्त एका कॉलिंग ॲपपुरते मर्यादित राहणार नाही, तर संपूर्ण Android सिस्टिममध्ये काम करेल.

याआधी Android मध्ये “Verified Calls” नावाचे फीचर होते, पण ते केवळ Google Phone ॲपमध्येच उपलब्ध होते. नवीन फीचर आल्यानंतर सॅमसंग, विव्हो, ओपो, वन प्लस आणि इतर सर्व अँड्रॉईड फोनमध्ये एकसारखी सुरक्षा मिळू शकते.

हेही वाचा: Robots Use in Strait of Hormuz: होर्मुझमध्ये अमेरिकेची मोठी तांत्रिक खेळी; पाण्याखालील सुरुंग शोधण्यासाठी उतरवले रोबोट्स

या फीचरमध्ये DNO म्हणजेच “Do-Not-Originate” नंबरवर विशेष लक्ष दिले जाणार आहे. हे असे नंबर असतात जे फक्त कॉल स्वीकारण्यासाठी वापरले जातात, जसे की बँकांचे हेल्पलाइन नंबर किंवा सरकारी कार्यालयांचे संपर्क क्रमांक. या नंबरवरून प्रत्यक्षात कोणालाही कॉल केला जात नाही. मात्र स्कॅमर्स हेच नंबर बनावट पद्धतीने वापरून लोकांना फसवतात. नवीन फीचर अशा नंबरची तपासणी करून संशयास्पद कॉल आधीच ओळखू शकते.

जेव्हा एखादा संशयास्पद कॉल येईल, तेव्हा अँड्रॉईड फोन त्या नंबरची डेटाबेसमधील DNO नंबरशी तुलना करेल. नंबर बनावट किंवा संशयास्पद असल्यास कॉल उचलण्यापूर्वीच वापरकर्त्याला इशारा दिला जाऊ शकतो. काही बँकिंग ॲप्स त्यांच्या अधिकृत नंबरची माहिती अँड्रॉईड सिस्टिमला देऊ शकतील, त्यामुळे कॉल तपासणी आणखी अचूक होईल.

Google चे हे फीचर अद्याप विकसित होत आहे आणि ते नेमके कधी उपलब्ध होईल याबाबत अधिकृत माहिती समोर आलेली नाही. मात्र हे फीचर सुरू झाल्यानंतर फसवे कॉल्स, बँकिंग फसवणूक आणि नंबर स्पूफिंगसारख्या प्रकारांना मोठ्या प्रमाणात आळा बसू शकतो. 

हेही वाचा: Bus Accident: टायर फुटल्याने प्रवाशांनी भरलेली बस दरीत कोसळली; 15 जणांचा मृत्यू, मृतांचा आकडा वाढण्याची भीती

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number