Google AI Gemini: शॉपिंग सीझनला नवा AI साथीदार; Google ने दाखवले ‘स्मार्ट खरेदी’चे चार नवे मार्ग

Gemini जवळच्या दुकानांना फोन करून वस्तूचा स्टॉक आहे की नाही याची खात्री करतो. त्यानंतर माहिती SMS किंवा ईमेलने तुमच्यापर्यंत पोहोचवली जाते.

Google AI Gemini: शॉपिंग सीझनला नवा AI साथीदार; Google ने दाखवले ‘स्मार्ट खरेदी’चे चार नवे मार्ग

Google ने यंदाच्या ब्लॅक फ्रायडे आणि सायबर मंडे शॉपिंग सीझनला अधिक सोपं आणि स्मार्ट बनवण्यासाठी आपल्या AI तंत्रज्ञानाचे चार नवे उपयोग जाहीर केले आहेत. ऑनलाइन खरेदी करताना योग्य सवलत मिळेल का, योग्य भेटवस्तू कोणती घ्यावी, जवळच्या दुकानात वस्तू आहे का, किंवा एखादे आउटफिट आपल्यावर कसं दिसेल हे सगळं आता AI काही सेकंदांत तुम्हाला सांगणार आहे. त्यामुळे या वर्षीची खरेदी अधिक आत्मविश्वासाने करता येणार आहे. पहिली सर्वात महत्त्वाची सुविधा म्हणजे price tracking. अनेक ग्राहक एखादी वस्तू स्वस्त होते का हे पाहण्यासाठी दिवसातून अनेकदा वेबसाइट तपासत असतात. पण आता Google Search मधील AI तुमच्यासाठी हे काम करेल. तुम्ही फक्त "track price" वर क्लिक करा, रंग साईझसारखे तपशील भरा, आणि किंमत कमी झाली की Google थेट सूचना पाठवेल. अमेरिकेत तर Google Pay च्या मदतीने स्वस्तात वस्तू मिळताच ऑटोमॅटिक चेकआउटही करता येईल.

दुसरी सुविधा खास त्यांच्यासाठी आहे ज्यांच्यासाठी गिफ्ट निवडणे नेहमीच अवघड ठरतं. Gemini App मध्ये AI फक्त त्या व्यक्तीची आवड, स्वभाव किंवा गरज ऐकून काही सेकंदात भेटवस्तूंच्या हुशार शिफारसी देईल. यात फोटो, रेटिंग्स, सवलती, आणि स्टॉकची माहितीही मिळेल. त्यामुळे भेटवस्तूसाठी धावपळ किंवा तासन्‌तास विचार करण्याची गरज उरणार नाही.

हेही वाचा: Palash Muchhal Mother on Wedding Postpone :पलाश मुच्छल सांगलीतून मुंबईला परतला; आईने खुलासा केला, म्हणाल्या 'लग्न पुढे ढकलल्यानंतर तो मानसिकदृष्ट्या…'

सणासुदीच्या काळात एक मोठी समस्या म्हणजे जवळच्या दुकानात वस्तू उपलब्ध आहे का हे जाणून घेणे. Google हेही तुमच्यासाठी आता स्वयंचलितरीत्या करणार आहे. Search मध्ये "near me" असा शोध दिल्यास Gemini जवळच्या दुकानांना फोन करून वस्तूचा स्टॉक आहे की नाही याची खात्री करतो. त्यानंतर माहिती SMS किंवा ईमेलने तुमच्यापर्यंत पोहोचवली जाते. हे फीचर सध्या toys, electronics आणि beauty प्रॉडक्ट्ससाठी टेस्ट केले जात आहे.

आता कपडे खरेदी करण्यासाठीही ट्रायल रूममध्ये जाण्याची गरज नाही. Google चे virtual try-on फीचर एका फोटोंवरूनच तुम्हाला स्वेटर, ड्रेस किंवा शूज तुमच्यावर कसे दिसतील हे दाखवू शकते. लाखो उत्पादनांमधील तुमच्या पसंतीचे कपडे फक्त काही सेकंदांत 'ट्राय' करता येतात. त्यामुळे सणासुदीचा परफेक्ट लुक शोधणेही आता पूर्वीपेक्षा सोपे झाले आहे.

एकूण पाहता, Google ने शॉपिंगचा अनुभव अधिक स्मार्ट, वेळ वाचवणारा आणि किफायतशीर करण्यासाठी AI चा मोठा उपयोग केला आहे. योग्य किंमत मिळवण्यापासून ते योग्य भेट निवडण्यापर्यंत सगळं आता एका क्लिकवर मिळणार आहे. आगामी खरेदी हंगामात ही AI साधने निश्चितच ग्राहकांसाठी गेमचेंजर ठरणार आहेत.

हेही वाचा: Kunal Kamra Controversy : 'अशा कुत्र्यांना पेकाटात लाथ…' कुणाल कामरच्या टी-शर्टवर भाजपची जोरदार टीका

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number