अमेरिका आणि इराण यांच्यातील संघर्ष १०७ दिवसांनंतर संपुष्टात आला आहे. दोन्ही देशांमध्ये 14 नियम व अटी असलेला करार झाल्याची आणि त्यास दोन्ही बाजूंनी सहमती दर्शविल्याची घोषणा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केली.
या घोषणेनंतर जागतिक बाजारपेठेत तत्काळ परिणाम दिसून आला. शेअर बाजारात वाढ झाली, कच्च्या तेलाच्या (क्रूड ऑइल) दरात घसरण झाली आणि सोने-चांदीच्या किमतींवरही मोठा प्रभाव पडला. मागील काही दिवसांपासून कच्च्या तेलाच्या (क्रूड ऑइल) किमती वाढत होत्या, तर शेअर बाजार आणि सोन्या-चांदीचे दर घसरत होते. मात्र होर्मुज पुन्हा सुरू होण्याची घोषणा झाल्यानंतर परिस्थिती पूर्णपणे बदलली.
या घोषणेमुळे कच्च्या तेलाच्या किमती अचानक मोठ्या प्रमाणात कोसळल्या, तर गेल्या काही दिवसांपासून घसरण होत असलेल्या सोन्या-चांदीच्या दरांनी जोरदार उसळी घेतली. सोमवारी सकाळी आंतरराष्ट्रीय कॉमेक्स बाजारात सोन्याच्या दरात मोठी वाढ दिसून आली. सोन्याचा भाव 93 डॉलर प्रति औंसपेक्षा जास्त वाढून 4,332 डॉलर प्रति औंसपर्यंत पोहोचला. त्याचबरोबर चांदीच्या दरातही जोरदार तेजी नोंदवली गेली असून चांदीचा भाव सुमारे 2 डॉलरने वाढून 70.36 डॉलर प्रति औंस झाला आहे.
सोन्याचे दर
24 कॅरेट 1 ग्रॅम गोल्डसाठी ग्राहकांना 14 हजार 900 रुपये मोजावे लागणार आहेत. 22 कॅरेटसाठी 13 हजार 663 रुपये मोजावे लागणार आहेत. 18 कॅरेटसाठी 11 हजार 180 रुपये मोजावे लागणार आहेत. एक तोळे सोन्यासाठी १ लाख 49 हजार रुपये मोजावे लागणार आहेत. त्यावर 5000 रुपयांचा GST देखील बसणार आहे. 23 कॅरेट एक तोळे सोन्यासाठी 1 लाख 47 हजार रुपये मोजावे लागणार आहेत. 22 कॅरेट सोन्यासाठी 1 लाख 10 हजार रुपये मोजावे लागणार आहेत आणि 18 कॅरेट एक तोळे सोन्यासाठी एक लाख 10 हजार रुपये मोजावे लागणार आहेत.
चांदीचे दर
चांदीसाठी एक ग्रॅम चांदीची किंमत 259 रुपये आहे. एक किलो चांदीसाठी 2 लाख 59, 900 रुपये मोजावे लागणार आहे. याशिवाय त्यावर मेकिंग चार्जेस आणि gst असे वेगळे पैसे द्यावे लागणार आहेत.